साईकिरण टाइम्स | २ फेब्रुवारी २०२१
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील गट नंबर ८६ /१/१६ फायनल प्लॉट नंबर १६ येथील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून, अनधिकृत बांधकामाच्या पाचपट दंड करून बांधकाम पाडण्यात यावे, या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे आजपासून (दि.२) श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
शिंदे यांनी उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली होती. वारंवार तक्रारी करून दखल न घेतल्यामुळे संबंधित बांधकामावर कारवाईसाठी उपोषणास बसत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या बांधकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली नव्हती. उपोषणास छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते संजय हजारे, छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विलास पाटणी, राजेश बोरुडे, अस्लम शेख, पवन भिंगारे, वेणुनाथ पवार, हरीश रसाळ जमील शेख आदींनी भेट दिली.