ग्रामविकास मंत्री 'राष्ट्रवादी'चे, तुमचे काम होणारच; अविनाश आदिक

श्रीरामपूर | येथील कॉग्रेस भवन येथे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित  ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार समारंभप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक. (छाया-अनिल पांडे)

________________________________________

साईकिरण टाइम्स | २६ जानेवारी २०२१
'श्रीरामपूर तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचातीचे काम घेऊन तुम्ही कॉग्रेस भवनला या तुमचे काम करेल', 'राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आहे. त्यामुळे तुमचे काम होणारच' येथे गट-तट पाहिले जाणार नाही मी स्वतः कोणाला विरोधक मानत नाही. परंतु, मला विरोधक मानतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक केले.

         येथील कॉग्रेस भवन येथे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार समारंभप्रसंगी आदिक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव पवार  होते. याप्रसंगी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष लकी सेठी, महिलाध्यक्षा अर्चना पानसरे, तालुका युवक अध्यक्ष सचिन पवार, नगरसेवक राजेद्र पवार, रईस जहागिरदार, अलतमश पटेल, मुक्ताहर शहा, भाऊसाहेब डोळस, कलीम कुरेशी आदी उपस्थित होते.   

         यावेळी आदिक म्हणाले, ग्रामपंचायत व पंचायत राज्य यांचे कामे करण्याची एक पध्दत आहे. ग्रामपंचयाती हि काम करणारी संस्था असते. ग्रामपंचयातीला मोठ्या प्रमाणात आधिकार देण्यात आल आहे. जर गावातील चांगल्या पध्दतीने काम करवायाचे असेल तर भांडणतंटे करु नका. सर्वानी मिळुण कामे करुन गावला चांगले रुप द्या. राज्यात सरकार आपले आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आहे. कॉग्रेसचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आहे. आपल्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री व  जिल्हाचे पालकमंत्री राष्ट्रवादी कॉग्रेसपक्षाचे हसन मुश्रीफ आहे. यामुळे आपल्या कामाना अडचण नाही. तुम्ही कॉग्रेस भवनला माझ्याकडे किंवा नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्याकडे नगरपालिकेत काम घेऊन जा. काम होणारच. शासकीय योजनाचा लाभ आपणास घेता येईल . राज्याचे असो किंवा केंद्राचे आपले ग्रामपंचयातीचे काम होणारच असे आदिक म्हणाले. 
           यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, स्वर्गीय गोविदरावजी आदिक असते तर त्यांना खुप आनंद झाला असता. आणि मी कृषक समाजाच्यावतीने सर्वाचे अभिनंदन करते व महिला सदस्याच्या आडचणी समजुन कार्य करावे.
         यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय शिंदे,  चंद्रकात संगम, भाऊ डाकले, सोहेल शेख, हर्षल दांगट, राहुल बोंबले, गोपाल वायदिशंकर, सि.वाय.पवार, भांगचंद औताडे, आमित हाडके, भाऊसाहेब वाघ, अ‍ॅड.जयंत चौधरी, प्रशांत खंडागळे, दिपक निबांळकर, भाऊसाहेब चोरमल, नंदु पाटील चोरमल, संजय शिंदे, वंसतराव पवार, अविनाश पवार, राजेद्र पवार, कृष्णा पवार, दादासाहेब qझज, लक्ष्मण धोंत्रे, नामदेव राऊत ,निलेश कुंदे, बाळासाहेब ताके, साहेबराव चोरमल, बाळासाहेब इंगळे, ज्ञानदेव ढवले, डॉ.राणा राशिकंर , प्रकाश वाणी, प्रविण पाटील, जालिदंर औताडे, भरत बोर्डे, नारायण कणसे, श्रीकांत डळे, अनिता बोर्डे, विलास ठोंबरे, अन्सार जहागिरदार,उल्हास जगताप, वाल्मिक आदिक, ज्ञानदेव आदिक आदि उपस्थित होते.  प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, यांनी केले तर आभार शहराध्यक्ष लकी सेठी यांनी केले.

खानापुरची ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाली. मात्र काही वर्तमानपत्रात हि निवडणुक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार मुरकुटे,विखे व ससाणे यांनी बिनविरोध केल्याच्या बातम्या आल्या. माझ्या गावची बिनविरोध होते तर तुमच्या गावची ग्रामपंचयातीत काय झाले. हे सर्व राज्याला माहिती आहे. माझ्या गावात मी निवडणुक  बिनविरोध करा असे सर्वाना सांगितले. गावातील ज्येष्टानी यात लक्ष घातले. तरुणानी त्यांना साथ दिली त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली. 


शहरात आज ट्रक्टर रैली 


राजधानी दिल्ली येथे शेतकरी मागील कितेक दिवसापासुन अंदोलन करत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त लाखोच्या संख्यात ट्रक्टर रैलीचे आदोलन करणार आहे. श्रीरामपूर येथे देखील शहराध्यक्षा लकी सेठी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवाना पांठीबा म्हणुन ट्रक्टर रैलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे अविनाश आदिक यांनी सांगितले.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post