अन तहसील कार्यालयात घडली ह्रुदस्पर्शी घटना....


साईकिरण टाइम्स | २५ जानेवारी २०२१

बेलापूर | प्रतिनिधी | एक दिव्यांग व्यक्ती तहसील कार्यालयाचा जिना उतरत होती... त्याच वेळेस दुसरी एक व्यक्ती जिना चढून वर जात होती...त्या व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीची अस्थावाईकपणे चौकशी करत हाताला धरुन, 'चल मी तुला रेशनकार्ड देतो' असे म्हणत पुरवठा विभागात नेले...व तातडीने रेशनकार्ड तयार करण्याचा आदेश दिला...अन काही वेळातच दिव्यांग व्यक्तीचे रेशनकार्ड तयार होऊन त्यावर स्वाक्षरी केली, ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून दस्तुरखुद्द तहसीलदार प्रशांत पाटील होते....ही ह्रुदस्पर्शी घटना सोमवारी (दि. २५) श्रीरामपूर तहसील कार्यालय येथे घडली. 

याबाबत माहिती अशी कि,श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील रहीवासी संदिप गंभीरे हे रेशनकार्ड मिळविण्यासाठी  तहसील कार्यालयात आले होते. पुरवठा विभागात गेल्यानंतर त्यांना 'आठ दहा दिवसांनी या' असे सांगितले. त्यामुळे निराश झालेले, पायाने अधु असलेले दिव्यांग गंभीरे जड अंतकरणाने तहसील कार्यालयाचा जिना उतरत होते. त्याच वेळेस तहसीलदार प्रशांत पाटील कार्यालयात जाण्यासाठी जिना चढत होते. एक दिव्यांग व्यक्ती जिना उतरताना त्यांनी पाहीले. या व्यक्तीचे नक्कीच काही तरी महत्वाचे काम असणार, अशी शंका त्यांना आली  त्यांनी दोन पावले मागे घेत त्या दिव्यांग व्यक्तीची अस्थावाईकपणे चौकशी केली. त्या वेळी त्या दिव्यांगाला हे माहीत नव्हते की हेच तहसीलदार आहेत व त्यांच्या सहीनेच आपल्याला रेशनकार्ड मिळणार. तहासीलदार प्रशांत पाटील यांनी चौकशी केल्यानंतर दिव्यांग व्यक्ती संदीप गंभींरे यांनी सांगितले की, रेशनकार्ड मिळावे या करीता हेलापाटे मारत आहे. त्या वेळी तहसीलदार पाटील यांनी गंभीरे यासं हाताला धरुन मागे फिरविले. अन माझ्या बरोबर चल मी तुला रेशनकार्ड देतो असे म्हणाले. या वाक्यामुळे गंभीरे यांना नवल वाटले की,  पुरवठा अधिकार्यांनी नाही म्हटले मग हे कोठुन देणार.. तहसीलदार पाटील यांनी गंभीरे यांना हाताला धरुन पुरवठा विभागात नेले व तातडीने रेशनकार्ड तयार करण्याचा आदेश दिला. अन काही वेळातच गंभीरे यांचे रेशनकार्ड तयार झाले. तहसीलदार पाटील यांनी सही करुन ते त्यांच्या हातात दिले. त्या वेळी संदिपं गंभीरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आधार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण खडके यांनी संघटनेच्या वतीने तहसीलदार पाटील यांचे आभार मानले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post