ऊर्जामंत्र्यांसह, महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची 'मनसे'ची मागणी


साईकिरण टाइम्स २६ जानेवारी २०२१

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह उर्जा सचिव व महावितरण अधिकारी यांच्या विरोधात ‘संगनमत करुन मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणुक केल्याचा गुन्हा’ दाखल करण्यात यावा, अशी मागणी 'मनसे'च्या वतीने करण्यात अली. 

           'मनसे'चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.२६) श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण संजय सानप यांच्याकडे लेखी तक्रार-निवेदन देण्यात आले. 

             यावेळी जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे, शहराध्यक्ष गणेश दिवसे,  विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष उदय उदावंत,  तालुका अध्यक्ष मनविसे राहुल दातीर,  शहराध्यक्ष मनविसे विशाल शिरसाट आदी  प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post