श्रीरामपूर | रोटरी क्लब व नागरी प्राथमिक आरोग्य केद्र नगर परिषद श्रीरामपूर यांच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण शुभारंभ नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.भारत गिडवाणी, सचिव हरसुख पद्माणी, राजेश कुंदे, उल्हास धुमाळ, विशाल कोटक,निलेश चुडिवाल,प्रेम नारा, बाळासाहेब पटारे, भाऊसाहेब वाघ, रईस जहागिरदार,राजेश शहा,उदय बधे, गुरुमुख रामनाणी, सागर चोरडिया, विशाल फोपळे,प्रसन्न धुमाळ, डॉ.सचिन पऱ्हे, डॉ.संकेत मुंदडा, आदि उपस्थित होते. (छाया -अनिल पांडे)
साईकिरण टाइम्स | ३१ जानेवारी २०२१
श्रीरामपूर | राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान ० ते ५ वय गटातील ९ हजार, सातशे पन्नास बालकाना पोलिओ डोस पाजण्यात आल्याची माहिती नागरी प्राथमिक आरोग्य केद्र नगर परिषद श्रीरामपूरचे डॉ.सचिन पऱ्हे व रोटरीचे अध्यक्ष डॉ.भारत गिडवानी यांनी दिली.
पल्स पोलिओ मोहिम राबवताना प्रशासनाकडून शहरात ३३ केद्रे उभारण्यात आली होती. यात २ बुथ मोबाईल टिम सह प्रामुख्याने शाळा,अंगणवाडी तसेच दावाखाण्यामध्ये हि मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते करण्यात आला.
रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.भारत गिडवाणी, सचिव हरसुख पद्माणी , राजेश कुंदे,उल्हास धुमाळ, विशाल कोटक,निलेश चुडिवाल,प्रेम नारा, बाळासाहेब पटारे, भाऊसाहेब वाघ, रईस जहागिरदार,राजेश शहा,उदय बधे, गुरुमुख रामनाणी, सागर चोरडिया, विशाल फोपळे,प्रसन्न धुमाळ, नागरी प्राथमीक आरोग्य केद्र नगर परिषद श्रीरामपूरचे डॉ.सचिन पèहे व तालुका आरोग्य आधिकारी डॉ.सांगळे,डॉ.संकेत मुंदडा,डॉ. योगश बंड यांच्यसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
सर्व केंद्रा वरील आशासेविका व आरोग्य कर्मचाèयाना रोटरीच्यावतीने २५० फुड पॅकेटस देण्यात आले. शहरात ३३ केंद्रातुन ११६१६ बालकापैकी ९७५० बालकाना पोलीओचा डोस देण्यात आला.उरलेल्याा १८६६ बालकाना येत्या पाच दिवसात घरोघरी जाऊन हा डोस दिला जाणार असल्याचे नगर परिषद श्रीरामपूरचे डॉ.सचिन पऱ्हे यांनी सांगितले.