'व्हाट्सअप ग्रुप'वर आक्षेपार्ह पोस्ट; पोलिसांची कारवाई

साईकिरण टाइम्स | २३ जानेवारी २०२१

बेलापूर (प्रतिनिधी ) समाजमाध्यम वापरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. व्हाट्सअप समूहावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका व्हाँटसअप ग्रुपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने मजकुर टाकल्याबद्दल वार्ड नंबर दोन येथील दोन व्यक्तीवर नुकतीच कारवाई करण्यात आली. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिला आहे.

एका गृपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकण्यात आली होती. ही बाब बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक सानप यांच्या लक्षात आणुन दिली. पोलीस निरीक्षक सानप यांनी तातडीने संबंधित गृप अँडमीनला बोलवून, आक्षेपार्ह पोस्ट बद्दल विचारणा केली असता ही पोस्ट वार्ड क्रमांक दोन मधील युवकांनी टाकली असुन त्या नंतर गृपचे सेटींग बदलुन ओन्ली अँडमीन असे करण्यात आल्याचेही सांगितले.

पोलीस निरीक्षक सानप यांनी, त्या दोघांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्या दोघांनी ती आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे कबुल केले. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने पोस्ट टाकून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमा झाला होता. पोलीसा निरीक्षक सानप यांनी दोन्ही बाजुच्या लोकांना समजुन सांगीतले. अशा प्रकारे पोस्ट टाकणाऱ्या व्यक्ती विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. सोशल मिडीया हे चांगले प्रसार माध्यम असले तरी त्याचा गैरवापर कुणी करु नये. व्हाँटस्अप गृप, फेसबुक, ट्विटर वर कुणी कुणाचा अपमान मानहानी होईल अशी पोस्ट टाकल्यास वा फाँरवर्ड केल्यास गृप अँडमीनसह पोस्ट फाँरवर्ड करणारावर कडक कारवाई केली जाईल. सर्व व्हाँटस्अप गृपवर पोलीसांची नजर आहे. समाजात अशांतता निर्माण होईल असे कृत्य कोणी करु नये, असे अवाहनही पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी केले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post