साईकिरण टाइम्स | २२ जानेवारी २०२१
श्रीरामपूर शहरातील गटारींसह कचऱ्याची नियमित साफसफाई करण्याची मागणी जे.जे. फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
जे.जे.फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष जोएफ जमादार यांनी मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, नगरपरिषदेकडून शहरात भुयारी गटारीच्या अर्धवट केलेल्या कामाचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ तर नाही उलट त्रास होत आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या रस्त्यालगतच्या गटारी नेहमी तुंबलेल्या दिसतात. त्याची नियमित साफसफाई होताना दिसत नाही. रस्त्यावर नेहमी कचऱ्याचे ढीग पहावयास मिळतात. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत नागरिकांनी लेखी, तोंडी, समक्ष तक्रार करूनही सुधारणा होत नसल्याचे म्हंटले आहे. भुयारी गटार योजनेचे काय झाले? असाही सवालही याठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे. कचरा व गटारींची साफसफाई करावी; अन्यथा जे.जे. फाउंडेशनच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.