पत्रकार समाजाचा दुवा म्हणून काम करतात : सरपंच बाबासाहेब चिडे

साईकिरण टाइम्स | २५ जानेवारी २०२१

श्रीरामपूर ( संदिप आसने ) एकेकाळी पत्रकारिता म्हणजे एक प्रकारचे व्रत समजले जात असे, मात्र स्वातंत्र्यानंतर गेल्या तीस वर्षापासून पत्रकारितेचे स्वरूप आमूलाग्र बदलले असून पत्रकार हा समाजाचा दुवा असून सर्वसामान्यांचा आधार असल्याचे विचार, श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथील लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे पा यांनी ग्रामपंचायतमध्ये आयोजित पत्रकार दिनाच्या समारंभात मांडले आहे. 

        श्रीरामपूर बाजार समितीचे माजी संचालक गिरीधर आसने पा,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुदामराव आसने पा, ग्रामसेवक मेहेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सरपंच बाबासाहेब चिडे पा यांच्या अध्यक्षतेखाली माळवाडगांव ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

           समाजहिताचे काम खऱ्या अर्थाने आज पत्रकार करत असतात. शासनाच्या विविध योजना तळागाळातील गोरगरीब नागरिकांपर्यंत वर्तमानपत्राच्या माध्यमातून पोहोचविण्याचे काम पत्रकार करत असतात, त्यांच्या कामाची पावती देणे हाच सत्काराचा मुख्य उद्देश असतो.पत्रकारिता हा व्यवसाय नसून धर्म आहे आणि तो सर्वसामान्यांशी निगडीत असलेला विषय आहे.त्यामुळे भरडला जाणारा समाज आपला एक आधार म्हणून पत्रकारांकडे पाहत असतात,आजची पत्रकारिता विचार करायला लावणारी आहे,म्हणूनच पत्रकार हा समाजाचा दुवा असून त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे अशा शुभेच्छा सरपंच बाबासाहेब चिडे पा यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांना दिले.

        गावाच्या सर्वांगीण विकासात पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांचे एक आगळेवेगळे स्थान आहे.पत्रकारांमुळे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम होत असते, पत्रकार हे आजच्या काळात सर्वसामान्य प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करत असतात त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे,असे मत भवानी देवीचे विश्वस्त बाळासाहेब हुरुळे यांनी यावेळी व्यक्त केले.

        यावेळी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव आसने,भाऊसाहेब काळे,संदीप आसने,इम्रान शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या समारंभास अशोक दुधचे संचालक पांडुरंग शिंदे,शेतकरी संघटनेचे शरद आसने,ग्रामपंचायत सदस्य अनिल आसने,संजय आसने,रावसाहेब काळे,विश्वास वाघमारे,दिलीप आसने,विठ्ठल कावरे,संजय बाबर आदी उपस्थित होते.यावेळी माळवाडगाव ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच ग्रामपंचायतमध्ये पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव आसने यांनी आभार मानले. 

          तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुदामराव आसने यांनीही केला पत्रकारांचा सत्कार माळवाडगांव तंटामुक्ती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुदामराव आसने यांनीही आज पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान करून पत्रकारांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post