चौंडी येथे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.त्यांच्या समवेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव राशिनकर, उपाध्यक्ष महेश ओहोळ, संचालक प्रविण काळे, विनोद जोशी, अशोक प्रधान, शरद बेहळे, ज्ञानेश्वर ओहोळ, विजय भगत, संदिप सोनवणे, ना बोरुडे, व्यवस्थापक बबलू पिंजारी आदि.
___________________________________
बेलापूर (वार्ताहर) येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर सहकारी पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असल्यामुळे संस्था लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली. भविष्यात या पतसंस्थेने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा सुरु करुन पतसंस्था चळवळीचे नेतृत्व करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
कर्जत तालुक्यातील चौंडी येथील माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पतसंस्थेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव राशिनकर, उपाध्यक्ष महेश ओहोळ, संचालक प्रविण काळे, विनोद जोशी, अशोक प्रधान, शरद बेहळे, ज्ञानेश्वर ओहोळ, विजय भगत, संदिप सोनवणे, रंजना बोरुडे, व्यवस्थापक बबलू पिंजारी आदि उपस्थित होते.
याबाबत अशोकराव राशिनकर यांनी सांगितले की, संस्थेला गतवर्षी ६ लाख १० हजारांचा निव्वळ नफा झाला असून, संस्थेने ६ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. तसेच संस्थेकडे ९ कोटी रुपयांच्या ठेवी जमा असून, संस्थेने २ कोटी ९० लाख रुपयांची बँक गुंतवणूक केली आहे.