साईकिरण टाइम्स | १ जानेवारी २०२०
बेलापूर (प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी याकरीता बेलापूर पत्रकार संघाने बोलविलेल्या सर्वपक्षिय बैठकीत ११९ उमेदवारापैकी ८५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेण्याबाबत सहमती दर्शविली. तथापि, काँग्रेसचे नेते श्री.अरुण पा.नाईक बैठकीस उपस्थित नसल्याने अंतिम निर्णय उद्या घेण्याबाबत बैठकीत एकमत झाले.
बेलापूर पत्रकार संघाने १५ जानेवारी रोजी १७ जागेकरीता होणारी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरु केले असुन या बैठकीत जनता आघाडीच्या २५ उमेदवाराचे उमेदवारी अर्ज माघार घेण्याबाबतचे लेखी पत्र जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड व माजी सरपंच भरत साळुंके यांनी दिले तर जि प सदस्य शरद नवले अभिषेक खंडागळे प्रफुल्ल डावरे यांच्या गटाने ३५ उमेदवारांची तर काँग्रेसचे सुधीर नवले यांनी १७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज माघारी घेणारांची यादी पत्रकार संघाकडे सुपूर्त केली. आठ अपक्ष उमेदवार यांनीही बिनविरोध निवडीस पाठींबा व्यक्त केला.
सदर बैठकीस काँग्रेसचे नेते अरुण पा.नाईक बैठकीस हजर नसल्याने त्यांचेशी चर्चा करुन शनिवार दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी अंतिम निर्णय जाहिर करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी सांगितले. बैठकीस सर्वश्री शरद नवले,रणजीत श्रीगोड, सुनिल मुथ्था,भास्कर खंडागळे , देवीदास देसाई, ज्ञानेश गवले, नवनाथ कुताळ सुहास शेलार किशोर कदम विष्णूपंत डावरे, रवी खटोड,भरत साळुंके ,सुधीर नवले,राजेश खटोड,कैलास चायल,अभिषेक खंंडागळे ,प्रफुल्ल डावरे , अशोक पवार,प्रसाद खरात,सुधाकर खंडागळे, जावेद शेख,विवेक वाबळे, हाजी ईस्माईल शेख,मोहसीन सय्यद ,प्रकाश जाजू ,दिपक क्षञिय,किशोर खरोटे,किरण गागरे,रफीक शेख,मोहसीन ख्वाजा शेख, रमेश अमोलिक, ,विजय शेलार,संदीप अमोलिक ,गणेश मगर दिलिप अमोलिक,रावसाहेब अमोलिक ,सोमनाथ जावरे आदिसह प्रमुख ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.