श्रीराम मंदीर कोणा एका जाती धर्माचेनाही तर मानवतेचे मंदीर ; स्वामी गोवंददेवगीरीजी महाराज 

साईकिरण टाइम्स | १७ जानेवारी २०२१

श्रीरामपूर |अयोध्या ही यापुर्वी जगाची सांस्कृतिक राजधानी होती आणि ती आता परत करावयाची आहे.हिंदवी स्वराज्य व्हावे ही जशी छत्रपती शिवरायांची इच्छा होती तशी अयोध्येत श्रीरामाचे मंदीर व्हावे ही सर्व भारतीयांची इच्छा आहे.श्रीरामाचे मंदीर हे कोणा एका जाती धर्माचे नाही तर मानवतेचे मंदीर असल्याचे प्रतिपादन श्रीराम मंदीर न्वयास समीतीचे कोषाध्यक्ष स्वामी गोवंददेवगीरीजी महाराज यांनी केले आहे.

श्रीरामपूर येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित प्रेरणा सभा व नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय मालपाणी, जिल्हा संघचालक भरत निमसे तर कार्यक्रमास जेष्ठ स्वयंसेवक हेरंबजी आवटी, अभियान संपर्क  प्रमुख प.पू. महेश व्यास महाराज, नासिक विभाग अभियान प्रमुख किशोर निर्मळ, जिल्हा अभियान प्रमुख श्रीकांत नळकांडे, सहप्रमुख ज्ञानेश आकसाळ, सदभावना सहकार्याने प्रमुख विठ्ठल शिंदे, जिल्हा कार्यवाह परिमल वेध,तालुका प्रमुख योगेश ओझा, श्री हनुमान मंदिर ट्रस्टचे मनोज पोरवाल, सुनिल गुप्ता, चंपालाल पोळे,सुभाष फेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले,बेलापुरला भागवताची परंपरा आहे तशी श्रीरामपुरला श्रीरामाची परंपरा आहे.आपण पहीली रामकथा श्रीरामपुरात अन पहीली भागवत कथा बेलापुरात केली होती.अयोध्या ही यापुर्वी जगाची सांस्कृतिक राजधानी होती आणि ती आता परत करावयाची आहे.हिंदवी स्वराज्य व्हावे ही जशी छत्रपती शिवरायांची इच्छा होती तशी अयोध्येत श्रीरामाचे मंदीर व्हावे ही सर्व भारतीयांची इच्छा आहे.श्रीरामाचे मंदीर हे कोणा एका जाती धर्माचे नाही तर मानवतेचे मंदीर आहे.राम मंदीर होणार की नाही याकडे कोट्यावधी भारतीयांचे लक्ष लागुन होते.मात्र आपण सर्वांनी ठरवलेले होते मंदीर हम बनाएंगे ! मंदीर वही बनाएेंगे !! ४९३ वर्षात ८० वेळा लढाया झाल्या आणि या लढाईत लाखो पुर्वजांनी श्रीरामासाठी बलीदान दिले आहे.आता मंदीर तयार होतांना ते बघण्याचे भाग्य आपल्या पुर्वजांना मिळाले नाही मात्र आपल्याला मिळाले आहे.

यावेळी जात,धर्म ,पंथ,प्रांत या भेदांच्या पलिकडे जाऊन सर्व भारतीयांच्या योगदानातून ऊभे राहणारे अयोध्या  येथील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र हे वैश्विक बंधुभावाचे प्रतिक असेल असे प्रतिपादन श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची केले आहे. 

यावेळी बोलताना स्वामीजी पुढे म्हणाले की पाचशे वर्षाच्या संघर्ष नंतर आपल्यासाठी  आनंदाचे  क्षण  येणार  आहे अनेकांनी यासाठी बलिदान दिले आहे त्याना ते पहाता आले नाही ते भाग्य आजच्या तरूण पिढीला लाभले आहे. श्रीरामपूर शहरावर माझे विशेष प्रेम आहे मंदिर निर्माणाची प्रेरणा या नगरीतून मिळाली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्याकडून पाच लाखांचा धनादेश तर अन्य मोठ्या  देणगीदारामध्ये श्रीनिवास बिहाणी, जितेंद्र छाजेड, चंद्रशेखर गोरे,संतोष काफिया,श्री इंपेक्स,प्रभात डेअर,के.के आव्हाड, गुप्ता परिवार,राजेंद्र कांबळे,किशोर निर्मळ, सुवालाल लुक्कड,दत्तात्रय माळवे  यांचा समावेश आहे. प्रारंभी पुरोहितानी वैदिक मंत्र तर सौ पौर्णिमा सारडा यांनी गुरूवंदना सादर केली.निधी संकलन अभियान, हनुमान मंदिर ट्रस्ट, विश्व हिंदु परिषद, श्रीक्षेत्र देवगड संस्थान, सरालाबेट संस्थान यांच्या वतीने प्रातिनिधिक सत्कार झाले डाॅ वंदना मुरकुटे यांनी बेटाच्या माहितीचे  पुस्तक भेट दिले प्रातिनिधिक संतोष खाबिया व रंगनाथ मेगदे यांचा सत्कार करण्यात आला..


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post