मुस्लिम बांधवांकडून 'श्रीराम मंदिरा'साठी ४४ हजाराची देणगी

साईकिरण टाइम्स | १७ जानेवारी २०२१

बेलापूर (प्रतिनिधी) श्रीराम मंदिर बांधकामात आपलाही सहभाग असावा, या हेतुने श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मुस्लिम बांधवानी ४४ हजार १११ रुपयाची देणगी राम मंदिराचे कोषाध्यक्ष, गोविंद देवगीरीजी महाराज तथा राष्ट्र संतआचार्य किशोरजी व्यास यांच्याकडे सुपूर्त केली. 


श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगीरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास हे बेलापूर  या जन्मगावी येणार असल्याची माहीती मुस्लीम बांधवांना मिळाली. जामा मस्जिदचे चिफ ट्रस्टी जाफरभाई आतार,  बहोद्दीन सय्यद हैदरभाई, अकबरभाई टिन मेकरवाले, हाजी ईस्माईल रफीक भाई शेख,  शफीक बागवान, मुनीर बागवान,  मोहसीन सय्यद, गँसुद्दीन शेख, आजिज शेख यांनी मुस्लिम बांधवाची ताताडीची बैठक बोलविली. बैठकीत राम मंदिराला देणगी देण्याचा विषय घेण्यात आला. सर्व मुस्लिम बांधवांनी ताताडीने आपापल्या परीने राम मंदिरासाठी आर्थीक मदत केली. 

आचार्य किशोरजी व्यास यांचे गावात आगमन होण्यापुर्वी मुस्लिम समाजाने ३३ हजार रुपये जमा केले होते. आचार्य किशोरजी व्यास यांचे बेलापूर गावातील जामा मस्जिदमध्ये आगमन होताच चिफ ट्रस्टी जाफराभाई आतार व बहोद्दीन सय्यद हाजी ईस्माईल अकबर टिन मेकरवाले यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी आणखी ११ हजार रुपये जमा झाले. अशा प्रकारे मुस्लिम बांधवांच्या वतीने राम मंदिर बांधाकामासाठी  ४४ हजार रुपयाची देणगी गोविंद देवागिरीजी महाराज यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली. 

या वेळी बोलताना हाजी ईस्माईल म्हणाले,  राम मंदिराच्या उभारणीत बेलापूरातील मुस्लीम बांधवाचा सहभाग असावा म्हणून आम्ही हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. अकबर भाई टिन मेकरवाले म्हणाले,  एका चांगल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य आम्हा मुस्लिम बांधवांना लाभले गावाच्या वतीने आणखी मोठी मदत करण्याचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post