समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; कंपनीकडून दंड वसुल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; छावा क्रांतिवीर सेनेचा उपोषणाचा इशारा


साई
किरण टाइम्स | ७ जानेवारी २०२१

समृद्धी महामार्गाला 'धर्मवीर छञपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग' असे नाव द्यावे तसेच समृद्धी, मुंबई-नागपूर महामार्गाच्या कामामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून संबंधित कंपनीने  अतिरिक्त उत्खनन केल्याने कंपनीस झालेला दंड वसुल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई   द्यावी; अन्यथा दि. १९ जानेवारीला उपोषण करण्याचा इशारा छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, शेतकरी भाऊसाहेब दहे, अहमदनगर कार्याध्यक्ष पप्पु शेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंञी बाळासाहेब थोरात, नाशिक विभागीय आयुक्त, अहमदनगर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना याबाबत निवेदन दिले आहे. 


निवेदनात नमूद केले आहे कि, छावा क्रांतीवीर सेना  दिनांक १३/१/२०२० पासून समृद्धी महामार्गाच्या कामात अतिरिक्त उत्खनन करत असल्याचा पाठपुरावा करत असताना, यात अनेक शेतकऱ्यांना शासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून उडवा उडवीचे उत्तर मिळत असल्याचे निदर्शनास आले. दि २४/१२/२०२० रोजी छावा क्रांतीवीर सेनेकडून वाहने फोडण्याचे निवेदन कोपरगाव तहसिलदार यांना दिले. दरम्यान, ५ दिवस आम्ही व स्थानिक शेतकरी यांच्या माध्यमातून वाहने अडविले असता आम्हाला शासकीय अधिकारी गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सदर कंपनीस झालेला दंड वसूल केल्यास, कोरोना काळात शासनालाच मदत होणार होईल. शासनाला गरज नसल्यास हा दंड वसूल करून कोपरगाव तालुक्यात बहुसंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने या शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी असेही निवेदनात म्हंटले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post