साईकिरण टाइम्स | ६ जानेवारी २०२१
बेलापूर | प्रतिनिधी | श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील पत्रकारांचा एम.आय.एम. व अल्लाउद्दीन बाबा चौक यांच्या वतीने वतीने पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम आदिंचा पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेषतः बेलापूर येथे नव्यानेच स्थापन झालेल्या एम.आय.एम.पक्षाच्या शाखेच्या वतीने हा सत्कार आयोजित करण्यात होता. सर्व पदाधिकारी नवीन व राजकारणात नवखे असूनही स्थानिक पक्षाच्या मुरलेल्या राजकीय पुढारी व संघटनांच्या अगोदर, वर्षभर आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वांना प्रकाशझोतात ठेवून प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांचा, पत्रकार दिनानिमित्त सत्कार केल्याबद्दल पत्रकार देविदास देसाई, सुहास शेलार यांनी एम आय एम च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छाही दिल्या.
यावेळी एम आय एम च्या बेलापूर शाखेचे शहराध्यक्ष मोसिन खाजा शेख, हाजी मंसूर सय्यद, सहसंघटक रफिक शाह, उपाध्यक्ष निसार शाह, नासिर हाजी बागवान, सोनू शेख, मोसिन शेख, सोमनाथ चिंतामणी, कलीम सय्यद, खाजाभाई टीन मेकर, शब्बीर शाह आदि उपस्थित होते.