औरंगाबादचे नामकरण 'छत्रपती संभाजीनगर' करण्यासाठी नगर जिल्ह्यात 'मनसे' आक्रमक; बसस्थनाकात लावले 'छत्रपती संभाजीनगर'चे नामफलक


साईकिरण टाइम्स |७ डिसेंबर २०२१

श्रीरामपूर ( अहमदनगर ) औरंगाबादचे नामकरण छत्रपती 'संभाजीनगर' करावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. 'मनसे'चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.७) मनसैनिकांनी श्रीरामपूर बसस्थानकात व बसेस वर 'छत्रपती संभाजीनगर' नावाचे फलक लावून, औरंगाबादचे नामकरण 'छत्रपती संभाजीनगर' करावे यासाठी आंदोलन केले. २६ जानेवारी पर्यंत औरंगाबादचे नामकरण 'छत्रपती संभाजीनगर' झाले नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.


मनसैनिकांनी श्रीरामपूर बस स्थानकातून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसवर छत्रपती 'संभाजीनगर' नावाचे फलक लावून,  'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो' , 'आघाडी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय',  'छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्या आघाडी सरकार व त्यांच्या मंत्र्यांचा निषेध असो' अशा घोषणा दिल्या.

याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले, क्रूर सैतानी वृत्तीच्या औरंगजेबाने हिंदुस्थानातील हिंदूंना गुलाम बनवून अत्याचार केले. आया-बहिणींची अब्रू लुटली. अनेक हिंदूंची मंदिरे पाडले. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले हिंदू रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या केली, अशा सैतानाचे नाव महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराला असणे म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सैतानाच्या नावाचे समर्थन करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री यांचाही तीव्र शब्दात निषेध केला.


याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे ,जिल्हा सचिव तुषार(तात्या) बोबडे, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, शहराध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाट, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका सरचिटणीस गोरक्षनाथ येळे, शहर सरचिटणीस रोहित जोंजाळ, तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, कामगार सेनेचे नंदू भाऊ गंगावणे, विद्यार्थी सेना तालुका सचिव विकी राऊत, विद्यार्थी सेना तालुका संघटक आतुल तारडे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब भालेराव, लखन कडवे, ज्ञानेश्वर काळे, मृत्युंजय रुद्राक्ष ,विद्यार्थी सेना शहर सरचिटणीस संकेत शेलार, उपशहर अध्यक्ष रतन वर्मा, प्रमोद शिंदे, विभागाध्यक्ष मारुती शिंदे, बजरंग शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्रीरामपूर बसस्थनाकात 'छत्रपती संभाजीनगर'चे नामफलक लावताना मनसैनिक 


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post