अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची भाषा करणाऱ्या खा. लोखंडेंना जिल्ह्याचा इतिहास माहिती आहे का?

साईकिरण टाइम्स | ९ जानेवारी २०२१

शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेने १७ दिवसांत सदाशिव लोखंडेंना खासदार केले ते शहरांची नावे बदलण्यासाठी नव्हे, तर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या तालुक्यांचा विकास करण्यासाठी, अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची भाषा करणाऱ्या खासदार लोखंडेंना जिल्ह्याचा इतिहास माहिती आहे का? असा घाणाघाती सवाल करून अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण करण्याची मागणी करणाऱ्या खासदार सदाशिव लोखंडेंचा समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध केला आहे.

हेही वाचा : रेशनकार्डला आधार व मोबाईल क्रमांक लिंक न केल्यास १ फेब्रुवारीपासुन धान्य बंद होणार

हेही वाचा : पुरवठा निरीक्षकावर पदनियुक्ती समाप्तीची विभागीय आयुक्ताची कारवाई; शासकीय  कर्मचाऱ्यांत खळबळ 

समाजवादी पार्टीचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष फैय्याज कुरेशी, शहराध्यक्ष इमरान इराणी याबाबत प्रसिद्धीस निवेदन दिले आहे. त्यात म्हंटले आहे कि, अहमदनगर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा असून जिल्ह्यात तसे अनेक पुरावे दिसून येतात. चांदबिबीचा महाल हा त्यातीलच एक आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण करून 'अंबिकानगर' करण्याची मागणी करणाऱ्या खा. सदाशिव लोखंडेंना त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील विकासाशी काही देणे नाही. अशी बिनकामाची मागणी करण्यापेक्षा खासदार लोखंडेंनी शिर्डी लोकसभा मतदार संघाअंतर्गत असणाऱ्या तालुक्यांचा विकास कशा प्रकारे करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे नमूद करून खासदार लोखंडेच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

शहराचे नावे बदलून पोट भरत नाही शहरांना आवडीचे नाव ठेवायचे असेल तर खा.लोखंडेंनी नवीन शहर वसवून त्यास आवडीचे नाव द्यावे, अशी खोचक टीका करून खासदारांच्या मागणीची हवा काढून घेतली आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post