डॉ.तौफिक शेख यांना समाजरत्न पुरस्कार


साईकिरण टाइम्स | १ जानेवारी २०२१

श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.तौफिक रफिक शेख यांना  नागेबाबा उद्योग समूह व महाराजा बहूउद्देशीय प्रतिष्ठान व सोशल सर्व्हिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  समाजरत्न (कोव्हीड रक्षक) पुरस्कार शानदार समारंभात प्रदान करण्यात आला.

मेळघाट येथील प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ.रविंद्र कोल्हे यांच्या हस्ते व बालरोगतज्ज्ञ डॉ.कुमार चोथाणी,महेश व्यास महाराज,नागेबाबाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, किसान कनेक्टचे अध्यक्ष किशोर निर्मळ, प्रेरणा मल्टिस्टेटचे सुरेश वाबळे, रामपाल पांडे तसेच सूरज सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार पुरस्कार सोहळा उत्सव मंगल कार्यालयात पार पडला. 

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजरत्नांबरोबरच सन-२०२० यावर्षी कोरोना जागतिक महामारीच्या काळात निस्वार्थी भावनेने समाजसेवा करणाऱ्या कोव्हीड योद्धांनाही यावेळी गौरविण्यात आले. डॉ.तौफिक शेख हे श्रीरामपूर येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्यरत असून त्यांचा  कोरोना महामारीत रुग्णांचा थ्रोट स्वाब घेण्यापासून ते कोव्हीड आयसीयू मध्ये रुग्णसेवा देण्यापर्यंत अविरत सहभाग होता.डॉ.शेख यांना यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांनी कोव्हीड योद्धा या पुरस्काराने गौरविले आहे. त्यांना मिळालेल्या या समाजरत्न पुरस्काराबद्दल त्यांचे समाजातील सर्व थरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post