साईकिरण टाइम्स | ३० जानेवारी २०२१
श्रीरामपूर |महात्मा गांधींचा अहिंसा आणि सत्याग्रहाचाच विचार जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतो आणि भारतासारख्या खंडप्राय देशाचा विकास देखील शांततेच्याच मार्गाने होऊ शकतो. अंत्यजच्या रूपा मध्ये गांधीजींनी बघितलेला परमेश्वरच देशातील सर्व धर्मीयांचा खरा देव असून गांधीजींनी दिलेल्या सर्व धर्म समभावाच्या विचाराची आज अधिकच गरज आहे, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, राजेंद्र औताडे, विशाल शिंदे, युवक काँग्रेसचे सुलतान जहागीरदार, रामपूरचे सरपंच भडांगे, राजेंद्र गुलदगड उपस्थित होते.