(छायाचित्र : अनिल पांडे )
साईकिरण टाइम्स |३० जानेवारी २०२१
नगर पालिकेच्यावतीने येथील लोकमान्य टिळक वाचनालय येथे तसेच मेनरोडवरील महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास हार घालुन अभिंवादन करताना नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक आदिक बोलत होत्या. यावेळी नगरसेविका सौ.चंद्रकला डोळस, मुख्याधिकारी गणेश शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब गागंड, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब डोळस, शहराध्यक्षा सौ. अर्चना पानसरे, पत्रकार पद्माकर शिंपी, उद्योजक बाबासाहेब काळे, बाळासाहेब भांड, प्रकाश कुलथे, राजेद्र पवार, मुख्तार शाह, रवी पाटील,राजेद्र पानसरे, रईस जहागिरदार, अल्तमश पटेल,विजय शिंदे, शहराध्यक्ष योगेश जाधव, सागर कुèहाडे, सैफ शेख, ग्रंथपाल गायकवाड आदि उपस्थित होत्या.
यावेळी नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, महात्मा गांधी यांच्या विचारांची आजच्या तरूणांना फार मोठी गरज आहे. महात्मा गांधीजींनी जो विचार मांडला, जी तत्वे त्यांनी अंगिकारली आणि सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं, ती तत्वे घेवून आपल्याला पुढे जायचं आहे. गांधी विचार आणि गांधीजींचे जीवन समजणे आपल्याला खूप महत्वपूर्ण आहे. प्रत्येक तरूणाने गांधीजींना वाचले पाहिजे, त्यांच्या कार्य आणि विचाराला समजून घेतले पाहिजे. महात्मा गांधीजींना अपेक्षित असणारा तरूण निर्माण होणे आवश्यक आहे. हस्तोद्योग, कुटिरोद्योग, शेतीउद्योग याला प्राधान्य देणे आवश्यक आहे आणि आजच्या तरूणांनी व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधने आवश्यक आहे.