स्व.आदिकांची कष्टकरी-शेतकऱ्यांसाठी योगदानाची परंपरा त्यांची कन्या व मुलगा चालवताय


श्रीरामपूर : खासदार स्वर्गीय गोविंराव आदिक यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त आदिक परिवाराच्या वतीने येथील कामगार रुग्णालयास कार्डियक मॉनिटर देण्यात आले. (छाया-अनिल पांडे)

________________________

साईकिरण टाइम्स | ४ जानेवारी २०२१

श्रीरामपूर (वार्ताहर) स्व. खा. गोविंदराव आदिक यांचे नेहमी गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यासाठी मोठे योगदान राहिले आहे. खा.आदिक यांची परंपरा त्यांची कन्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व मुलगा अविनाश आदिक चालवत आहे, असे कामगार नेते अविनाश आपटे म्हणाले. 


माजी मंत्री, खा. स्व.गोविंराव आदिक यांच्या ८२ व्या जयंती निमित्त आदिक परिवाराच्या वतीने येथील कामगार रुग्णालयास कार्डियक मॉनिटर व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ५ हजार फेस शिल्ड देण्यात आले. यावेळी कामगार नेते तसेच कामगार रुग्णालयाचे विश्वस्त अविनाश आपटे बोलते होते.


यावेळी श्रीमती पुष्पलताताई आदिक,राष्ट्रवादि कॉगे्रसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक,बी.आर.आदिक, कामगार हॉस्पिटलचे वैद्यकिय आधिकारी रविंद्र जगधने, बापुसाहेब आदिक,  नगरसेवक अंजुम शेख, निलोफर शेख, महमंद शेख, श्यामलिंग शिंदे, बाळासाहेब गागंड, भाऊसाहेब डोळस, राजेद्र पवार, मुख्ताहर शाह, दिपक बाळासाहेब चव्हाण, रवी पाटील, प्रकाश ढोकणे, रईस जाहागिरदार,ताराचंद रणदिवे, कलीम कुरेशी, अलतमश पटेल, शिवसेनेचे सचिन बडदे, डॉ.महेश क्षिरसागर आदि उपस्थित होते.


यावेळी आपटे काका म्हणाले की, कामगार रुग्नालय हे सर्वसामान्यसाठी नेहमीच सेवा देते .या रुग्णालयास ज्योतीबा फुले योजना नाही तरी ही आम्ही गोरगरीबासाठी माफक दरात सेवा देतो. काही रुग्ना कडे तर ते ही नसते त्यांना मोफत सेवा दिली जाते. आदिक परिवारा प्रमाणे शहरातील दानशुर तसेच विविध संघटना नेहमीच मदत करत असतात. कामगार रुग्णालयाला नेहमी आदिक कुंटुबियानी मदत केली आहे. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व अविनाश आदिक यांना रुग्णालयास काय पाहिजे असे विचारतात व तत्काळ ती सामुग्री पाठवतात, असे कामगार नेते अविनाश आपटे यांनी सांगितले. स्वर्गीय खासदार गोविंदराव आदिक यांनी नेहमीच सर्वसामान्य साठी काम केले. साखर कामगाराचे प्रश्ना बाबत आग्रेसर असत त्यांचप्रमाणे वैद्यकिय सेवा हि सर्वसामान्याना मिळाली पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न असे.


यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक म्हणाले की, दरवर्षी साहेबाच्या जयंतीला शिबिरे घेतली जातात. मात्र यावर्षी कोविड ससंर्ग असल्याने आपण शिबीर न घेता हि यंत्रसामग्री दिली आहे. कोविड अजुन संपलेला नाही. मी आठ दिवसापुर्वी मराठवाड्यात गेलो होतो. तेथील दोन आमदार मला भेटले. एक माजी आमदार साहेबा बरोबर पुलोदो सरकार मध्ये होते. तर दुसरे आमदार साहेबाच्या सहकार्यने आमदार झाले होते. त्यांनी साहेबाच्या आठवणी सांगितल्या. साहेब नेहमीच सर्वत्र कामानिमित्त जात असताना त्यांना गोरगिरबाची सेवा करावी हे त्यांच्या मनात नेहमी असे व ते कार्य ही करत राहिले.  


त्यांना शहरात चांगले कामे होऊ द्यायची नाही 

नगराध्यक्षा राब-राब राबते आहे. गेली चार वर्षे तीचे हेच काम चालु आहे. तीला आत्मीक समाधान मिळते. पंरतु, शहरात आज सर्वच नेते मंडळी एक झाली आहेत. आमदार चांगले आहे त्यांचा त्रास नाही, पण हि मंडळी शहरात चांगले कामे होऊनच द्यायची नाही असे प्रयत्न करत असल्याचे अविनाश आदिक म्हणाले.  


यावेळी नगरसेवक राजेद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. स्व. आदिक साहेबामुळेच शहराचा विकास झाला आहे. त्यांनीच एमआयडीसी, एस.टी. कार्यशाळा, शासकीय विश्रामगृह, आर.टी ओ. कार्यालय आणले.  उड्डाणपुल केला. स्वागत डॉ.रविद्र जगधने यांनी केले. तर आभार नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी मानले. 


यावेळी सनी बोर्डे, राम अग्रवाल, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष लकी सेठी, महिला अध्यक्ष अर्चना पानसरे, मल्लु शिंदे, योगेश जाधव,निरंजन भोसले, हर्षल दांगट, सोहेल शेख, नजीर मुलानी, साजिद मिर्झा, अकील शेख, जया जगताप, हंसराज आदिक, सुनिल थोरात, ऋुषी डावखर, रजणीत पाटील, राजेद्र पानसरे, विजय शिंदे, सुनिल साठे, अनंत पतंगे, बाळासाहेब भोसले, जयंत चौधरी, अनिरुध्द भिगांरवाला, सागर भागवत, नयन गांंधी, भागंचद औताडे, बापुसाहेब पटारे, तौफिक शेख,गणेश ठाणगे, सैफ शेख,शकील बागवान, प्रकाश पावुलबुध्दे, सुनिल उबाळे, समिर बागवाण, सागर कुèहाडे, सोहेल शेख, गोपाल वायंदेशकर, रज्जाक पठाण, सुभाष गायकवाड, अमित घडके, निखील सानप, सचिन काळे, सुभाष त्रिभुवन, संदिप मगर, विलास ठोंबरे, जयकर मगर, प्रशांत खंडागळे, नितिन पवार, एस.के.खान, विजय खाजेकर, नामदेव राऊत , सरवरअल्ली सय्यद,यासमीन शेख, मदनलाल बतरा, प्रसन्न धुमाळ, भाऊसाहेब चोरमल, ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी,अनिल पांडे,प्रदिप आहेर, देवा कोकणे, भगवाण आदिक, वंसत पवार, उल्हास जगताप, बबनराव तागड,उत्तमराव पवार, डॉ.राजराम जोंधळे आदि उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post