साईकिरण टाइम्स | ४ जानेवारी २०२१
श्रीरामपूर | भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर भारतीय जनता पार्टी, मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई व एच. व्ही. देसाई आय केअर हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी दिली.
शिबिर येथील मेनरोडवरील आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालयाचे आगाशे हॉलमध्ये शनिवार दि. ९ जानेवारी रोजी होणार आहे. शिबिर सर्व वयोगटासाठी खुले असून जास्तीत जास्त गरजुंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सतिश सौदागर, मिलींदकुमार साळवे, अजित बाबेल, माजी शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे, विशाल यादव, अक्षय वर्पे, रविंद्र पंडीत, अरूण धर्माधिकारी, अमित गदिया, अमित मुथ्था, सौ. अनिता शर्मा, बाबूराम शर्मा, चंद्रकांत परदेशी, गणेश अभंग, बंडुकुमार शिंदे आदींनी केले आहे. इच्छुकांनी राममंदिर रोडवरील मारूती ग्लास व संगमनेर रोडवरील राठी एजन्सीज येथे संपर्क साधावा.