श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी संजय सानप यांची नुकतीच नेमणूक झाली. त्याबद्दल पत्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माहिती व कायदाचे कार्यकारी संपादक सुहास शेलार, दै.लोकवेधचे जिल्हा प्रतिनिधी अशोक शेलार, दै.राष्ट्र सह्याद्रीचे प्रतिनिधी किशोर कदम, पत्रकार शकील बाबा शेख, साईकिरण टाइम्सचे संपादक राजेश बोरुडे यांनी पीआय सानप यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
बेलापूर गावास भेट द्यावी, पत्रकार सेवा संघाच्या बेलापूर शाखा उदघाटनास येण्याची विनंती जेष्ठ पत्रकार सुहास शेलार यांनी पोनि.सानप यांना केली. राजेश बोरुडे यांनी, पत्रकारांना मेल वर किंवा व्हाट्सअप समुहाच्या माध्यमातुन प्रेसनोट पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती पोलीस पीआय सानप यांना केली.