देशपातळीवरील सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरची रश्मी शिंदे द्वितीय


साईकिरण टाइम्स | ४ जानेवारी २०२१

श्रीरामपूर | देशातील नामांकित 'दि ग्रेट पिजंट कॅमुनीटी' या संस्थेने आयोजित केलेल्या  सौंदर्य स्पर्धेत श्रीरामपूरच्या मराठमोळ्या कु. रश्मी राजीव शिंदे हिने देशात  उपविजेतेपद मिळवुन श्रीरामपूर आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

केवळ सौंदर्यच नव्हे तर बुद्धिमत्तेचा कस लावणाऱ्या या  ऑनलाईन  स्पर्धेत देशातून चार हजारावर युवतींनी भाग घेतला होता. मुंबई, पुणे आदी शहरी भागांच्या तुलनेत श्रीरामपूर सारख्या ग्रामीण भागातून मोठे यश मिळविणारी रश्मी ही राज्यातील पहिलीच युवती आहे. उपविजेती रश्मी ही टेक्सटाईल इंजिनिअरची पदवीधारक आहे. ती राष्ट्रस्तरीय स्केटिंग व राज्यस्तरीय बास्केटबॉल यासह एक उत्कृष्ट ऍथलेट आहे. स्केटिंगवर रॅम्प वॉक करणारी ती देशातील प्रथम सौंदर्यवती युवती आहे.तीने मिस टॅलेंट सह अनेक नामांकने मिळविली आहेत.

प्रेरणा फौंडेशन या सामाजिक संस्थेची ती मानद सचिव आहे.तसेच रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ स्व. अँड.रावसाहेब शिंदे यांची रश्मी ही नात व डॉ. राजीव आणि डॉ. प्रेरणा शिंदे यांची सुकन्या आहे. या सुयशाबद्दल तिचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले असून मिस इंडिया, मिस वर्ल्ड सारख्या मोठया स्पर्धेत सुयश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post