साईकिरण टाइम्स | २ जानेवारी २०२१
बेलापूर ( प्रतिनिधी ) कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता नागरीकांचे रक्षण करणाऱ्या पोलीसांचा 'पोलीस स्थापना दिनानिमित्त' पत्रकार व ग्रामस्थांच्या वतीने पोलीसांचा सत्कार करण्यात आला.
पोलीस स्थापना दिनानिमित्त श्रीरामपूर वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार देविदास रजपुत, हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे, निखील तमनर, प्रसाद इंगळे, हरिष पानसंबळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते अकबर टिन मेकरवाले, चंद्रकांत पा .नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुऱ्हे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकार सुहास शेलार, किशोर कदम, अजिज शेख, श्रीरामपूर तालुका पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष दिलीप दायमा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक देविदास देसाई यांनी केले तर रामेश्वर ढोकणे यांनी आभार मानले.