'इनरव्हिल क्लब श्रीरामपूर' प्रांतात आघाडीवर ; मजुरांना ब्लॅंकेट, कपडे वाटप

कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करताना प्रांतपाल अनुराधा चांडक समवेत क्लबचे अध्यक्षा सुजता शेंडगे, सचिव दिप्ती दहीमिवाळ उपाध्यक्ष ममता गुप्ता, खजिनदार सुरेखा दंड, जनसंर्पक आधिकारी प्रिया अग्रवाल , प्रिया शाह, श्वेता शाह,सुनिता धुमाळ आदि.(छाया-अनिल पांडे)

साईकिरण टाइम्स |३ जानेवारी २०२१

श्रीरामपूर | इनरव्हिल क्लबने ग्रामीण भागातील गाव दत्तक घेऊन एक आदर्श असा प्रकल्प केला असून  यामुळे हा क्लब प्रांतात आघाडीवर असल्याचे, प्रतिपादन प्रातंपाल अनुराधा चांडक यांनी केले. 

इनरव्हिल क्लब श्रीरामपूरला प्रांतीक चेअरमन अनुराधा चांडक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दत्त घेतलेल्या गावाला भेट दिली. शनि शिगनापूर येथे जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. यांनतर श्रीरामपूर येथे आयोजीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या क्लबच्या अध्यक्षा सुजता शेंडगे, सचिव दिप्ती दहीमिवाळ उपाध्यक्ष ममता गुप्ता, खजिनदार सुरेखा दंड, जनसंर्पक आधिकारी प्रिया अग्रवाल , प्रिया शाह, श्वेता शाह, सुनिता धुमाळ यांच्यासह क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.    

अनुराधा चांडक यांच्या हस्ते दत्तक घेतलेल्या गावात खडीफोडणारे मजुराना थंडीपासुन बचावाचे बॅल्केट घालायला कपडे तसेच अन्नदान करण्यात आले. या गावातील शाळेला सतरंजी व सॅनीटायझर डिस्पेंसर देण्यात आले. पिशव्या शिवण्यासाठी पिशव्याचा तागा, दोन मोठ्या कचरापेटी देण्यात आले. हे साहित्य वाटपानंतर झालेल्या कार्यक्रमात त्या म्हणाल्या,  या क्लबने आठ ते दहा वर्षेत मोठी समाजउपयोगी कार्य केले आहे. पुढेही या क्लबने असे कार्य करावे आपण सर्वते सहकार्य करु असे आश्वासन दिले.

क्लबच्या अध्यक्षा सुजाता शेंडगे यांनी आता पर्यंत केलेल्या कामे सांगितले. क्लबच्या माध्यामातुन सर्वसामान्य गरजंवतुना सहकार्य, मदत केली जाते. यासाठी क्लबच्या सदस्या भरभरुन सहकार्य करतात. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव दिप्ती दहीमिवाळ यांनी केले. सूत्रसंचालन जनसर्पक आधिकारी प्रिया अग्रवाल यांनी केले.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post