साईकिरण टाइम्स | २९ जानेवारी २०२१
श्रीरामपूर | विद्यार्थ्यांनी शालेय जिवनातच त्यांच्या अधिकाराबाबत व समान तेबाबत तसेच रोड सेफ्टी बाबत पालकांना जागरुक करावे,असे मार्गदर्शन तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. ए.सलीम यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती श्रीरामपूर व वकीलसंघ श्रीरामपूर यांचे संयुक्त विद्यमाने भि.रा.खटोड कन्या विद्यालय श्रीरामूपर येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर व बालीका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या शिबीराचे अध्यक्षस्थान तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एन.सलीम यांनी हे होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश व.स्तर डी.पी.कासट,२रे सह दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ एस.एम.बोमीडवार, अध्यक्ष वकील संघ के.जी.रोकडे, सहाय्यक सरकारी वकील प्रसन्न गटणे, हिंद सेवा मंडळाचे सह सचिव व विद्यालयाचे चेअरमन अशोक उपाध्ये प्राचार्य विजय तागड तसेच वकील संघाचे सदस्य, डॉ.राजाराम जोंधळे, अॅड.कैलास आगे,अॅड.बाबा शेख उपस्थित होते. यावेळी अॅड. शबाना बागवान यांनी बालिका दिवस या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन केले.
यावेळी अॅड. तुषार चौंदते यांनी रस्त्यावरील सुरक्षीततेच्या फलकाबाबत जागृती आणि प्रोटेक्शन ऑफ गुड समारिटन या विषयावर कायदेशीर मार्गदर्शन केले. न्यायाधीश सलीम यांनी शाळेतील विद्याथ्र्यीनी दैंनदीन जीवनात रस्त्यावरील रोड सेफ्टी साईन्स बाबत स्वता: देखील जागरुक रहाणे बाबत आणि स्वता:च्या पालकांदा देखील त्या बाबत अवगत करण्याकरीतासांगितले. यावेळेस कायदेविषयक मार्गदर्शन करीत असतांना अतिशय सुंदर उदाहरणांचे दाखले देवुन विद्याथ्र्यीनीना समजुन सागीतले.
कार्यक्रमाचे प्रास्तिविक qहद सेवा मंडळाचे सहसचिव व विद्यालयाचे चेअरमन अशोक उपाध्ये यांनी केले. या शाळेत २ हजार ३ तीनशे विद्याध्र्यीनी शिक्षण घेत आहे. जिल्हयात या शाळेचे नाव आहे. येथील विद्यार्थीनी विविध पदावर आहेत. येथे कायदेविषयक माहिती देण्याचे हे तीसरे शिबीर असल्याचे त्यांनी सागितले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता भि.रा.खटोड.कन्या विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, उपप्राचार्यआबासाहेब कापसे, पर्यवेक्षक विद्या देशपांडे,तसेच कोर्टातील व लिपीक करंदीकर व पोलीस स्टेशन श्रीरामपूर चे पोलिस हेड कॉन्स्टेबल व्ही.आर.घाणे यांनी परिश्रम घेतले. आभार विजय आगलावे यांनी केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभांगी गटणे यांनी केले.