डॉ. दत्ता विघावे यांना 'प्रकाश किरण प्रतिष्ठानचा विशेष गौरव पुरस्कार -२०२१' प्रदान


साईकिरण टाइम्स | ३० जानेवारी २०२१

श्रीरामपूर | कला, क्रिडा, साहित्य व समाजसेवा या क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल जेष्ठ क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक डॉ. दत्ता विघावे यांना प्रकाश किरण प्रतिष्ठान श्रीरामपूर यांच्या वतीने दिला जाणारा " राज्यस्तरीय विशेष गौरव पुरस्कार २०२१ " श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी मा. श्री. अनिलजी पवार व श्रीरामपूरचे तहसिलदार मा. श्री. प्रशांतजी पाटील यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.लेविन भोसले सर, वर्ल्ड पार्लमेंटचे सदस्य राजेंद्र देसाई हे उपस्थित होते.

                  डॉ. दत्ता विघावे हे वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) च्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष व डब्ल्यूसीपीए च्या नॅशनल मिडीया को -ऑर्डीनेटर तसेच युनायटेड नेशन्सच्या ग्लोबल टॅलेंट पुलचे सदस्य आहेत. कोरोना महामारीच्या काळात देशभरातील पंधरा हजाराहून अधिक कोरोना योद्ध्यांना " वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर अवॉर्ड " देऊन त्यांचे मनोवैज्ञानिक बळ वाढविण्यात डॉ. दत्ता विघावे यांनी मौलिक वाटा उचलला आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post