साईकिरण टाइम्स | २९ जानेवारी २०२१
मालाड | प्रतिनिधी |दीपक जगझाप | 'धडक ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक-मालक युनियन'च्या कुरार विभाग अध्यक्षपदी रहीम शेख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
संघटनेचे संस्थापक अभिजीत राणे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने शेख यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी टॅक्सी मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष विजय मिश्रा, सय्यद शेख, उम्मर शेख, तौफिक घाची, अविनाश नार्वेकर आदी सदस्य उपस्थित होते. रहीम शेख यांची नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.