श्रीरामपूर : नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आझाद मैदानावर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पूजन करून अभिवादन केले. (छाया - अनिल पांडे)
साईकिरण टाइम्स | ३ जानेवारी २०२१
श्रीरामपूर | भारतातील प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांबद्दल चुल आणि मुल ही भावना मोडीत काढली, स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळवून दिली असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.
श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आझाद मैदानावर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पूजन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक आप्पा गागंड, रवी पाटील, प्रकाश ढोकणे, मुक्ताहर शहा, दिपक चव्हाण, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, राजेद्र पवार, अलतमश पटेल, अर्चना पानसरे, डॉ.रविद्र जगधने, विजय खाजेकर, रज्जाक पठाण, ग्रथपाल गायकवाड, पत्रकार बाळासाहेब भांड, प्रकाश जाधव, तौफिक शेख, योगेश जाधव, गायकवाड आदी उपस्थित होते.
आदिक पुढे म्हणाल्या, आज स्त्री जी कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, स्त्रियांचे जीवनशैली ज्यांनी पुर्णपणे बदलली अशा स्त्रीशिक्षणाच्या अराध्य दैवत भारतातील प्रथम शिक्षिका प्रथम मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुलेंना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करते.