सावित्रीबाई फुलेंमुळे महिला शिक्षणाचा प्रसार


साईकिरण टाइम्स | ३ जानेवारी २०२१

श्रीरामपूर (प्रतिनिधी) स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने महिला शिक्षणाचा प्रसार केला. त्यांच्यामुळे समाजातील सर्व स्त्रिया सन्मानाने जीवन जगत आहेत. शासनाने सावित्रीबाईंचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. पुढील काळातही महिला शिक्षणासाठी सर्व शिक्षकांनी चांगले योगदान द्यावे. सक्षम व आदर्श महिला समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. ऊर्दू शाळा क्रमांक पाच ने आज अत्यंत सुंदर प्रकारे नियोजन करून क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती साजरी केली. त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देत असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी केले.

     श्रीरामपूर नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये महिला शिक्षण दिन व सावित्रीबाई फुले जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प टारे बोलत होते. 

        सावित्रीबाई व फातिमा शेख यांनी आपल्या कार्यातून महिला शिक्षणाची द्वारे समाजासाठी उघडी केली. तत्कालीन सामाजिक प्रथेच्या विरोधात बंड करून त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे आज महिलांना समाजात सर्वत्र मानाचे स्थान प्राप्त झाले आहे असेही ते म्हणाले.

      यावेळी शाळेची विद्यार्थिनी कु .बुशरा फिरोज शेख हिने सावित्रीबाईची वेशभूषा परिधान करून त्यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. शाळेच्या शिक्षिका सौ. शाहीन पठाण यांनी आपल्या व्याख्यानातून सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवला. फातिमा बीबी व सावित्रीबाई या दोन्ही खऱ्या अर्थाने महिला शिक्षणाच्या पुरस्कर्ता आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी शाळेतर्फे सर्व महिला शिक्षकांचा यथोचित सन्मान प्रशासन अधिकारी पटारे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक  सामाजिक अंतर ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मुर्तुझा यांनी केले तर एजाज चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली फारूक शाह, जमील काकर,  वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन पठाण, अस्मा पटेल, निलोफर शेख, बशीरा पठाण, मिनाज शेख, आसिफ अन्सारी, एजाज चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post