जसमितसिंग वधवा यांनी नगर जिल्ह्याचे नाव उंचविले


श्रीरामपूर
| जसमितसिंग वधवा यांनी कमी कालावाधीत मोठ्या पल्ल्याचा प्रवास केल्याने नगर जिल्हयाने नाव उंचविले असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.

अहमदनगर येथील जसमितसिंग वधवा यांनी नुकताच इडिया गेट (दिल्ली), गेटवेअ ऑफ इडिया (मुबंई) असा १४६० किलोमिटर सायकल प्रवास मात्र ६ दिवसात पुर्ण केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा अधिक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीरामपूर शहराध्यक्ष लकी सेठी, जसमितसिंग वधवा, देवद्रंसिंग वधवा,आई मनिषाकौर वधवा, पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके, जनकसेठ अहुजा, अजिक्य झिरपे, सुरजत कदम,सनी वधवा, सौ.सिमरन वधवा, सौ.सहेज वधवा आदिसह सायकलप्रेमी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले, आपण रस्त्याने प्रवास करता सायकल किवां पायी चालणाऱ्या प्रवाशास मागे टाकण्याच्या प्रयत्न केला. परंतु, वधवा यांनी सायकल प्रवास करुन आदर्श निर्माण केला आहे. पुढील काळात पोलिस प्रशासनातील क्रिडा पहु वधवा सोबत प्रवास दौरा केल्यास आपण मदत करणार आहे. 

जसमितसिंग यांनी पहिल्या दिवशी दिल्ली ते जयपुर दुसऱ्या दिवशी जयपुर ते भिलवाडा, तिसऱ्या दिवशी बडोदा, सुरत,वापी मार्ग मुंबई येथे प्रवास केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्कालीन प्रवास केलेल्या प्रवासमार्गे वधवा यांनी प्रवास केल्याने त्याला आणखीव महत्व आले. तसेच पुढील वर्षी ३३८० किलोमिटर कश्मिर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. सुत्रसचंलन लकी सेठी यांनी केले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post