न्यू इंग्लिश स्कूल उक्कलगाव विद्यालयात 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


साईकिरण टाइम्स |२८ जानेवारी २०२१

श्रीरामपूर | तालुक्यातील उक्कलगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामपूर तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलिप मारुती पा. थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले.

        यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशावरील कोरोना रोगाचे संकट जवळजवळ दूर झाले असले तरी, प्रत्येकाने सरकारी नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने पाचवी पासूनचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासाबाबत दक्ष राहून सहकार्य करावे. ते म्हणाले, याप्रमाणे, 

        विद्यालयात रांगोळी व चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे निरीक्षण अनेक मान्यवरांनी केले. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष इंद्रनाथ पा.थोरात, सुनिल बन्सी थोरात, सरपंच नितिन पा. थोरात,पुरुषोत्तम थोरात, शिवाजी थोरात, विकास रामदास थोरात, निवृत्ती पा. थोरात, रविंद्र थोरात, अनिल भाऊसाहेब थोरात, अनिल जगधने, रविंद्र जगधने, वसंतराव थोरात, नंदकुमार थोरात, प्रकाश जगधने, मच्छिंद्र धनवटे, एकनाथ यशवंतराव थोरात, विनोद थोरात, सुरेश मुसमाडे, गोरखनाथ शिंदे, रविंद्र विश्वनाथ पा. थोरात,  सौ. सुमती औताडे,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, याप्रसंगी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post