साईकिरण टाइम्स | २६ जानेवारी २०२१
श्रीरामपूर | प्रतिनिधी | येथील परमवीर शहीद अब्दुल हमीद नगर पालिका शाळा क्रमांक पाच मध्ये ७१ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अहमद सिकंदर शाह यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, जायदा बी कुरेशी, ताराचंद रणदिवे, मुक्तार शहा, माजी नगरसेवक नजीर मुलाणी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाकभाई पठाण, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गफारभाई पोपटिया, अशपाकभाई शेख तसेच किशोर शिंदे, हमीद चौधरी, कलीम कुरेशी, साजिद मिर्झा, वाहेदअली शाह, शाळा क्र ४ व ९ च्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांचे मार्गदर्शना खाली उपशिक्षक फारुक शाह, वहिदा सय्यद, नसरीन ईनामदार, जमील काकर, शाहीन शेख, आस्मा पटेल, निलोफर शेख, बशीरा पठाण, आसिफ मुर्तुजा, मिनाज शेख, एजाज चौधरी, युवराज पाटील, सदफ शेख, यास्मीन पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले .