साईकिरण टाइम्स | २४ जानेवारी २०२१
उक्कलगाव | प्रतिनिधी | श्रीस्वामी समर्थ केंद्र उक्कलगाव कृषी महोत्सव व प्रदर्शन जनजागृती करणारे असून, श्रीस्वामी समर्थांचा मार्ग हा देशाला खरा दिशा देणारा आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नेते इंद्रनाथ थोरात यांनी कृषी महोत्सव सप्ताहप्रसंगी बोलताना केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री.थोरात म्हणाले की, जागतिक कृषी महोत्सव सप्ताह आजही जगभरात ११०० ठिकाणी एकदिवसीय कृषीचा जनजागरचे आयोजन करण्यात आले आहे, श्रीस्वामी समर्थ सेवा यांच्या माध्यमातून व अध्यात्मिक विकासमार्ग दिंडोरीप्रणित व अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत कृषी शास्त्र विभाग आयोजित प्रदर्शन भरविण्यात आले आहे, श्रीस्वामी समर्थ केद्राने भरविलेले कृषी प्रदर्शन हे दिशादर्शक ठरेल असेही श्री.थोरात म्हणाले. प्रारंभी कृषी अधिकारी सौ. अश्विनी गोडसे,प्राजक्ता नवाते,आदींच्या हस्ते स्वामी समर्थ पूजन व आरती घेण्यात आली. तुळशीपुजन मान्यवरांनी जल अर्पण करून केले.यावेळी कृषी अधिकारी आश्विनी गोडसे,प्राजक्ता नवाते,दिपक बोरसे,गिरमे अप्पा, आदींनी मनोगत व्यक्त केले. शेती करताना रासायनिक खते वापरताना शेतीवर काय परिणाम होतो. त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो.हे टाळण्यासाठी विषमुक्त शेती कशी करावी बियाणे कोणते वापरावे याबाबत सविस्तर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कमी खर्चात कोणते फायदेशीर पीक उत्पादन करावे.आद्रक सारखी पिके घ्यावीत आदी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे थेटप्रक्षेपण राहुल बाबुराव थोरात यांनी केले. यावेळी बालसंस्कारच्या मुलांनी आपले आचरण कसे असावे,पाश्चात्य ज्या सवयी आहेत त्या सोडून द्याव्यात त्यांचे प्रात्यक्षिक पथनाट्याव्दारे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यानी केले.
केंद्रालागत एक स्टोअर रूम उभारण्यात येणार असल्याने भाविकांनी तसेच मान्यवरांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मान्यवरांनी,ग्रामस्थांनी प्रदर्शनाची पाहणी करून भेट देऊन महिला व बालकांनी विक्रीस ठेवलेल्या भाजीपाला,देव्हारे,आदी वस्तूंची खरेदी करून प्रतिसाद दिला.सूत्र संचालन अरविंद थोरात व आभार प्रदर्शन आप्पासाहेब थोरात यांनी केले. यावेळी रावसाहेब थोरात,सुनील थोरात,आबासाहेब थोरात,आप्पासाहेब गिरमे,कान्हेनाना,सरपंच नितीन थोरात,व भाविक,सर्व तालुका प्रतिनिधी,कृषी प्रतिनिधी,केंद्र प्रतिनिधी,सेवेकरी बंधू,भगिनी मोठय संख्येने सहभागी होते.