बेलापूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ७२.५० टक्के मतदान ; दोन्ही मंडळाचा विजयाचा दावा


साईकिरण टाइम्स | १५ जानेवारी २०२१

बेलापूर | प्रतिनिधी | श्रीरामपूर तालुक्यात सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या बेलापुर ग्रामपंचायतीच्या १७ जागेकरीता मतदान शांततेत पार पडले. एकुण ७२.५० टक्के मतदान झाले. बेलापूर गावात एकूण १४ हजार १०४ मतदारांपैकी १० हजार २१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

प्रभाग क्रमांक १ मध्ये एकुण मतदार १ हजार ८९५ पैकी १हजार ३४९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावाला. प्रभाग क्रमांक दोन मध्ये ऐकुण मतदान २३५० पैकी १६९६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक  तीन मधुन ऐकुण मतदार होते २८५४ पैकी २०७६ जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक चार मध्ये ऐकुण २१२३ मतदार होते पैकी १६३७ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक पाच मध्ये ऐकुण मतदार होते २०३९पैकी १४१४मतदारानी मतदानाचा हक्क बजावला प्रभात क्रमांक सहा मध्ये ऐकूण मतदार होते २८८१पैकी २०४६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 

जि.प.सदस्य शरद नवले सुनिल मुथा अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांचा गावकरी मंडळ तर जनता अघाडीचे रविंद्र खटोड काँग्रेसचे अरुण पा नाईक व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांचा जनता विकास अघाडी  यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होती त्यात प्रभाग क्रमांक एक दोन तीन सहा मध्ये अपक्ष उमेदवार असल्यामुळै सर्वच प्रभागात कमालीची चुरस निर्माण झाली आहे प्रत्येक प्रभागात दोनही पँनल बरोबरच अपक्षांनीही आपला हात सैल सोडल्यामुळे सकाळपासुनच मतदारांनी मतदान केंद्राभोवती रांगा लावल्या होत्या काही अनुचित प्रकार होवु नये म्हणून भापोसे आयुष नोपाणी हे बेलापुरात तळ ठोकुन होते सर्व मतदारांचे भवितव्य आता मशिनमध्ये बंद झाले आहे अपक्षासह दोनही पँनलने विजयाचा दावा केला असला तरी मतदार कुणाला कौल देणार हे सोमवारच्या निकाला नंतरच जाहीर होईल. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post