साईकिरण टाइम्स | १६ जानेवारी २०२१
श्रीगोंदा | नगरपालिका स्वतःची खाजगी मालकी असल्यासारखे वागून वारेमाप भ्रष्टाचार, अरेरावी आणि मनमानी कारभार सुरू असलेल्या श्रीगोंदा पालिकेतील मुठभर लोक आता तरी सुधारतील काय?? असा सवाल अँड. दीपाली नंदकुमार बोरुडे यांनी उपस्थित केला आहे.
श्रीगोंदा नगरपालिकेच्या कारभारासंदर्भात अँड दीपाली बोरुडे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पुन्हा एकदा स्वतःचेच खरे करण्यासाठी 'अश्या चौकशा कायमच सुरू असतात' असे निर्लज्जपणे सांगून 'आम्ही त्यातले नाहीच' असे दाखवून स्वतःच स्वतःवर 'कायमच पांघरूण' तर ओढून घेत नाहीत ना!
आता तरी नगरपालिका प्रशासनाला जाग येईल काय?? या सगळया चुकीच्या गोष्टींचा विरोध करून ही मुजोरी थांबवण्याची ताकत ज्या 'विरोधकांना' आहे ते कुंभकर्ण झोपेतून जागेच होणार नाहीत का? की सोंग घेऊन पडणार आहेत!! की यांना प्रशासकीय कामकाज समजतं नाहीय?? असेही बोरुडे यांनी म्हंटले आहे.
जिल्हाधिकारी यांनी अँड.समित बोरुडे, टिळकजी भोस, सतिशजी बोरुडे यांच्या सातत्याची दखल घेऊन श्रीगोंद्याला येणं केलं हे काय श्रीगोंदेकरांसाठी थोडं झालं काय! 'नगरपालिका पोखरून श्रीगोंदेकरांचं मातेर' करणाऱ्या या प्रशासनावर चौकशी होऊन काय कारवाई होते ते समजून घेण्यासारखंच असेल. चौकशी निःपक्षपातीपणे होईल की नेहमीसारखी राजकीय दबावाला बळी पडून सत्य दाबण्याचा प्रयत्न केला जाईल? हे समोर येईलच,असे अँड. दीपाली नंदकुमार बोरुडे यांनी म्हंटले आहे.