साईकिरण टाइम्स | १४ जानेवारी २०२१
बेलापूर | प्रतिनिधी | तब्बल 9 कोटी रुपयांचा सापडलेला चेक प्राध्यापक जालिंदर विटनोर यांनी बँक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक जालिंदर विटनोर हे पुणे येथे महाविद्यालयाच्या कामासाठी गेले असता. त्यांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या गेटमध्ये नऊ कोटी रुपयांचा चेक सापडला, तो त्यांनी प्रामाणिकपणे बँकेच्या अधिकार्यांकडे सुपूर्द करून प्रामाणिकपणा बरोबरच आपल्या पेशाची गरिमा राखण्याचे काम केले आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राचे महाप्रबंधक कुलकर्णी व पारिख यांनी कौतुक करून त्यांचा सत्कार केला.
प्राध्यापक विटनोर यांच्या या प्रामाणिकपणाचे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ढोकणे, तसेच व्हाईस चेअरमन दत्ता पाटील ढूस, माजी चेअरमन उदयसिंह पाटील, माजी व्हाईस चेअरमन श्याम निमसे, सेक्रेटरी महेश पाटील तसेच सर्व संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकारी पारखे यांचेसह विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपानराव मगर, शिक्षक प्रतिनिधी प्रशांत होन, वारुळे, संजय कोळसे, सुरेश चव्हाण, उदय गायकवाड, एस व्ही चव्हाण, शिक्षकेतर प्रतिनिधी राजेंद्र खरात, भाऊसाहेब शिंदे, तांबे,देवकर, अंबिलवादे, पारखे, जाधव, आदी शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.