'जेजे फाउंडेशन' तर्फे गरजूंना मदतीचा हात


साईकिरण टाइम्स | १ जानेवारी २०२१

श्रीरामपूर | सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या 'जेजे फाउंडेशन' संघटनेतर्फे मिल्लतनगर येथे गरजुंना किराणा किटचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना जे जे फाउंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार म्हणाले, कोरोणामुळे परिस्थिती गंभीर आहे. यामध्ये हळूहळू सुधारणा होत असली तरी अनेक गोरगरिबांना खाण्यासाठी अन्न मिळत नाही. अशा गरजू लोकांचा शोध घेऊन त्यांना महिनाभर पुरेल असे किराणा सामान देण्यात आले आहे. समाजातील गरजू लोकांना फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने किराणा किटचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी सर्व शाकिर सैय्यद (सरकार किराना), असिफ तंबोली, जकरिया सैय्यद, दानिश शाह, अरबाज कुरैशी, मुबश्शीर पठान, यूसुफभाई पठान,अल्तमश शेख, मोहसिन कुरेशी, शाकिर शेख, शहेजाद शेख, युनूस मेमन,साद पठान, शकील शेख,मुजम्मिल शेख,कलीम वेल्डर, अनवर तंबोली,रेहान शेख, ईमरान शेख,आदि उपस्थित होते. शाकिर  सय्यद यांनी आभार मानले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post