श्रीरामपूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची सोमवारी सोडत


साईकिरण टाइम्स | १० डिसेंबर २०२०

बेलापूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असुन, सोमवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार असल्यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ५२ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असुन गावोगाव मोर्चे बांधणीस सुरुवात झाली आहे. मतदार याद्यांच्या हरकती पार पडल्या नतर आता सोमवारी तहसील कार्यालय नविन प्रशासकीय इमारतीत सकाळी ११ वाजता सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. या सोडती नंतर उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या उपस्थितीत ५० टक्के महीला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे जि.प.सदस्य पचांयत समिती  सदस्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आदिंनी सोमवारी उपस्थित रहावे, असे अवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकामुळे ग्रामीण भागात प्रभाग निहाय उमेदवार निवडण्यासाठी बैठका सुरु झाल्या आहेत. कुणी कुणा सोबत युती करावी हे ही तपासुन पाहीले जात आहे. मागील काही काळात घडलेल्या राजकीय  नाट्यमय घडामोडीमुळे आता ग्रामीण भागातही कार्यकर्ते आपापल्या सोयी नुसार निवडणूक लढविण्यास ईच्छूक आहेत आता तरुण कार्यकर्ते निवडणूक लढण्यास तयार आहेत. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post