साईकिरण टाइम्स | १३ डिसेंबर २०२०
श्रीरामपूर | पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार करत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी पुतळा येथे रविवारी (दि.१३) आंदोलन केले. भाजप नेते रावसाहेब दानवे हे कायम शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करतात, दानवे हे 'दानवे आहेत का दानव' असा संतप्त सवाल शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी यावेळी केला.
२०१४ ला मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यास पेट्रोल ४० रुपये आणि डिझेल ३० रुपये करू, असे आश्वासन दिले होते. परंतु, आज पेट्रोल आणि डिझेल शंभरी गाठली आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे पार कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी श्रीरामपूर शिवसेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. 'पेट्रोल व डिझेल दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायम शेतकऱ्यांच्या विरोधात खूप विचित्र वक्तव्य करतात. देशभर शेतकरी आंदोलन होत असताना, शेतकरी पाकिस्तान आणि चीनचे एजंट असल्याचे वक्तव्यकरणाऱ्या दानवेंचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, उपजिल्हाप्रमुख योगेश बोरुडे, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, जिल्हा संघटक महेश क्षीरसागर, व्यापारी आघाडीचे जिल्हाप्रमुख रामा शेठ अग्रवाल, मदनलाल बत्रा, हितेंद्र गुप्ता युवासेनेचे निखिल पवार, राहुल रणधीर, सचिन रसाळ, बाळासाहेब गायकवाड ,सुरेश भारस्कर, विष्णू भाऊ मोढे, आबा बिरारी, सुभाष जंगले सर, दिनेश पोपळघट, यासीन सय्यद, अरुण पाटील, अशोक थोरे, शरद भणगे शरद डोळसे ,वाघोले मामा, शुभम ताके,गणेश गवारे ,नितीन फुगे विलास भालेराव ,पांडुरंग व्यवहारे, विशाल धनवटे,रोहित भोसले, सत्तू गोड महाराज, अक्षय कोकणे,दिपक थोरात आदी उपस्थित होते.