जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूरात व्हर्च्युअल रॅलीचे प्रसारण


श्रीरामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील पक्ष कार्यलयातुन प्रसारित व्हर्च्युअल रॅलीचे प्रक्षेपण श्रीरामपूर येथील कॉग्रेस भवन येथे राष्ट्रवादी कॉग्रसे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या उपस्थितीत पार पडले. (छाया-अनिल पांडे)

साईकिरण टाइम्स | १३ डिसेंबर २०२०

श्रीरामपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील पक्ष कार्यलयातुन प्रसारित व्हर्च्युअल रॅलीचे प्रसारण श्रीरामपूर येथील कॉग्रेस भवन येथे राष्ट्रवादी कॉग्रसे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या उपस्थितीत पार पडले. 

कॉग्रेस भवन येथील बॅरीस्टर रामराव आदिक सभागृहात मोठया पडदा (लेईडी) व्दारे थेट ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. मुंबई येथील कार्यक्रमाचे प्रमुख वक्ताची मार्गदर्शनपर भाषणे व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने केलेले विविध उपक्रम सामाजिक कार्य व राष्ट्रवादी कॉग्रेसचे विविध मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या लघुपटमध्ये श्रीरामपूर येथील कलाकाराव्दारे पवार साहेब संरक्षण खात्यात समावेश केलेल्या लघुपटास उत्तर महाराष्ट्र विभागात विशेष पुरस्कार प्राप्त झाला. त्या कलाकराचे राष्ट्रवादी कॉग्रसे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कलाकार हर्षवर्धन वैराळ, भक्ती जगधने, विमल जगधने, प्रतिक मोडे, विक्रम त्रिभुवन, अंकित यादव यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रसे प्रदेश प्रतिनिधी डॉ. रविद्र जगधने, मल्लु शिंदे, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे,शहराध्यक्ष लकी सेठी, महिला अध्यक्ष अर्चना पानसरे,नगरसेवक बाळासाहेब गांगड, राजेंद्र पवार, मुक्तहार शहा, भाऊसाहेब डोळस, रईस जाहगिरदार, कलीम कुरेशी, अलतमश पटेल, प्रकाश ढोकणे, जया जगताप, योगेश जाधव, निरंजन भोसले, नजिर मुल्लानी, उत्तमराव पवार गगांधर बनसोडे, गगांधर पवार,तालुकाध्यक्ष युवक सचिन पवार, सोेहेल शेख,श्रींकात दळे, हर्षल दांगट, शफीक शहा, सरवरअल्ली सय्यद, सैफ शेख, बापुसाहेब पटारे, अ‍ॅड. राजेश बोर्डे, विजय डावखर, तौफिक शेख, ऋुषिकेश डावखर, राजेद्र मोरगे, एस.के.खान. वंसतराव पवार, अ‍ॅड. जयंत चौधरी, कैलास पवार, विश्वनाथ आवटी, बंडु पवार, राजेद्र पवार,आप्पासाहेब वाघ, रमेश पवार, भागचंद औताडे, अमित हाडके, चंद्रकात सगम, निखिल सानप, हंसराज आदिक, सुनिल थोरात, भाऊसाहेब वाघ,रोनीत घोरपडे,विलास ठोेंबरे, नयन गांधी आदि उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post