जी.के.पाटील यांच्या निधनाने परिपक्व नेतृत्व हरपलं : आ.डॉ. सुधीर तांबे

साईकिरण टाइम्स | ६ डिसेंबर २०२०

श्रीरामपूर | जी.के.पाटील यांच्या निधनाने परिपक्व नेतृत्व हरपलं असल्याचे भावना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली. श्रीरामपूर काँग्रेस कडून जेष्ठ नेते स्व.जी.के पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार तांबे पुढे म्हणाले की, जी.के पाटील यांच्या अकाली निधनाने आपले सर्वांचेच मोठं नुकसान झाले आहे. अनेक महत्वपूर्ण   विषयांमध्ये जी.के पाटलांनी योग्य ते निर्णय घेऊन एक दिशा दिली त्यामुळेच आपण परिपक्व नेत्याला मुकलो असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी आमदार लहू कानडे म्हणाले की, स्व.जी.के पाटील आमच्यासाठी जेष्ठ मार्गदर्शक म्हणून काम करत होते. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी प्रमाणे ते कायमच कार्यरत राहिले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एखाद्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला.  स्व.जी.के पाटील यांचे योगदान कायमच स्मरणात राहील असे प्रतिपादन त्यांनी केले.
उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, स्व.ससाणे साहेबांच्या राजकीय व सामाजिक कार्यात स्व.जी.के पाटील साहेबांचा मोलाचा वाटा होता. थोरल्या भावाप्रमाणे  स्व.ससाणे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तीच साथ आणि आशीर्वाद बकाल साहेबांनी आम्हाला दिले. त्यामुळे स्व.बकाल साहेबांचं मोठं ऋण आमच्यावर असल्याचे म्हटले आहे.
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर बोलतांना म्हणाले की, अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि संयमी नेतृत्व म्हणजे बकाल साहेब.ज्या ज्या पदांवर काम केले त्याठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांच्या खांद्याला खांदा लावून बकाल साहेब कार्यरत राहिले. त्यांच्या अकाली निधनाने पितृतुल्य नेतृत्व हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, पंचायत समिती सदस्या डॉ वंदना मुरकुटे, बाबासाहेब कोळसे, तनपुरे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जेष्ठ नेते रामशेठ वलेशा, रमण मुथा, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबाबसाहेब दिघे, कॉ.आणासाहेब थोरात, सुधीर नवले, राजेंद्र पाउलबुद्धे, अशोक पवार, नगरसेवक दिलीप नागरे, मुज्जफर शेख, रितेश रोटे, मनोज लबडे, लक्ष्मण कुमावत समीन बागवान, मल्लू शिंदे, प्रसाद चौधरी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ फ़ंड, शहराध्यक्ष अभिजित लिपटे, सेवादल काँग्रेसचे  रावसाहेब आल्हाट, सरबजीतसिंग चुग, भास्कर लिपटे, शरद बनकर, प्रा.बाळासाहेब पवार, राजेंद्र आदिक, मुरली राऊत, सतीश बोर्डे, अशोक उपाध्ये, सुधीर वायखिंडे, महंता यादव, नितीन पिपाडा, प्रमोद भोसले, सुभाष गायकवाड, द्वारकानाथ बडधे, सनी मंडलिक, अमोल शेटे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शोकसभेची सांगता पसायदानाने झाली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post