साईकिरण टाइम्स | ७ डिसेंबर २०२०
श्रीरामपूर | केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने शेतकरी व कामगार विरोधी कायदे लोकशाही पायदळी तुडवत मंजूर केले आहे. त्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सह्यांची मोहीम राबविण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आमदार लहुजी कानडे व युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पंचवीस हजार सह्या प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सुपूर्द केल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक व शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी दिली आहे.
प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने अतिशय हुकूमशाही पध्दतीने शेतकरी व कामगार विरोधी कायदे मंजूर केले आहे त्याविरोधात देशभर सर्वत्र विरोध होत आहे. त्याविरोधात महाराष्ट्रात नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाने सक्रिय सहभाग नोंदवला श्रीरामपूर मतदारसंघातील गावं आणि शहरातील सर्वच प्रभागात व्यापक मोहीम राबवली त्यामध्ये काँग्रेसच्या सर्वच सेलचे पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन केंद्र सरकार विरोधातील प्रदेश काँग्रेसची मोहीम यशस्वी केली असल्याचे म्हटले आहे.
जनरेट्यापुढे केंद्र सरकारला झुकून शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांमध्ये बदल करणेस भाग पडणार असल्याचे म्हटले असून शेतकरी व कामगार हितासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून वेळप्रसंगी नामदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे आणि युवा नेते करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा गुजर, नाईक आणि छल्लारे यांनी दिला आहे.पत्रकावर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर,जेष्ठ नेते उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोत संजय फ़ंड, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई दिघे, मंगलाताई पवार, पंचायत समिती सदस्य डॉ.वंदनाताई मुरकुटे, विजय शिंदे, नगरसेवक दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, मुज्जफर शेख, मनोज लबडे, भारतीताई परदेशी, आशाताई रासकर, मिराताई रोटे, जिल्हा काँग्रेसचे बाबासाहेब कोळसे, कार्लस साठे, लक्ष्मण कुमावत, सुभाष तोरणे, समीन बागवान,सुरेश शिंदे,अल्पसंख्याक विभागाचे दिपक कदम, सरबजीतसिंग चुग, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिध्दार्थ फ़ंड, सोमनाथ चौधरी, अभिजित लिपटे, आकाश क्षिरसागर, अमोल शेटे, सनी मंडलिक यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.