बेलापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध बाबतचा 'ऐतिहासिक निर्णय' ३० डिसेंबरला


साईकिरण टाइम्स | २४ डिसेंबर २०२०

बेलापूर (प्रतिनिधी ) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यत म्हणजे ३० डिसेंबर रोजी सर्व पक्षीय बैठक घेवुन बेलापूर  ग्रामपंचायत निवडणूक 'बिनविरोध'होण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, या सर्वपक्षिय प्रमुखांनी  मांडलेल्या सुचनेला  कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.    

श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या बेलापुर बु!! गावाची ग्रामपंचायत निवडणूक दिनांक १५ जानेवारी रोजी होत असुन १७ जागेकरीता होणारी ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव बेलापुर पत्रकार संघाने गावातील नेते मंडळीसमोर मांडला होता. या प्रस्तावास सर्वपक्षिय प्रमुख नेत्यांनी मान्यता दिल्यानंतर काल पुढील दिशा ठरविण्यासाठी पुन्हा कोअर कमिटीची बैठक  बोलविण्यात आली होती. त्या बैठकीतही सर्वांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीत बेलापुर ग्रामपंचायत  सदस्य निवडी बाबत ठोस अशी रुपरेषा ठरविण्यात आली. या वेळी बेलापुर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांनी सांगितले की संर्व प्रमुख नेत्यांनी आपापल्याला पँनलचे उमेदवारी अर्ज दाखल करुन दिनांक ३०डिसेंबर रोजी सर्व उमेदवार यांची माहीती तसेच उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा फाँर्म कोअर कमिटीकडे जमा करावेत. या सर्व अर्जातुन सर्वानुमते सतरा सदस्य निवडण्यात येतील व उर्वरीत उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. हा सतरा जणाचा पँनल हा गावचा पँनल असेल. काहींनी जर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर गावाचा पँनल विरुध्द ते उमेदवार अशी लढत होईल. सर्व पक्ष  गट तट विसरुन एकत्र होवुन गावाच्या निर्णया विरुध्द जाणाऱ्या  उमेदवारांविरुध्द विरोधात सर्वपक्षिय  नेते मंडळी प्रचार करतील या मुथा यांच्या प्रस्तावाला सर्वांनी सहमती दर्शविली. 

यावेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले,माजी सरपंच भरत साळुंके, भाजपाचे शहर प्रमुख प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, साई पावन प्रतिष्ठानचे कैलास चायल भाऊसाहेब दाभाडे, सुधाकर खंडागळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय डाकले ,विक्रम नाईक,  हाजी ईस्माईल शेख आदिंनी चर्चेत सहभाग घेतला.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक हे बाहेरगावी असल्याने त्यांनी दूरध्वनिवरुन या प्रस्तावास संमती दिली. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे  मारुती राशिनकर, रणजीत श्रीगोड, सुनील मुथा,नवनाथ कुताळ,ज्ञानेश्वर गवले दिलीप दायमा आदि उपस्थित होते शेवटी पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी आभार मानले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post