साईकिरण टाइम्स | २३ डिसेंबर २०२०
बेलापूर (वार्ताहर) काँग्रेस प्रणित एन. एस. यु. आय. या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी अक्षय अरुण पा. नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव व एन. एस. यु. आय. च्या प्रभारी रिची गुप्ता ,राष्ट्रीय अध्यक्ष निरज कुंदन,महाराष्ट्र प्रभारी अमितसिंग टिमा यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमीर शेख यांच्या नैतृत्वाखाली संघटनेचा विस्तार करण्यात आला. त्यात बेलापुर येथील युवा कार्यकर्ते अक्षय नाईक यांची प्रदेश सचिवपदी नियुक्त केल्याची घोषणा मुंबईत करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीने प्रदेश पातळीवर गावातून नियुक्ती झालेले ते एकमेव आहेत.
या नियुक्तीबद्द्ल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले,आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, सरचिटणीस करण ससाणे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे ,तालुका काँग्रेसचे नेते माजी सभापती सचिन गुजर, बाजार समिती संचालक सुधीर नवले ,पं स.सदस्य व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक आदींनी त्याचे कौतुक केले आहे.