साईकिरण टाइम्स | २५ डिसेंबर २०२०
बेलापूर (प्रतिनिधी ) चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर समाजाने शाबासकीची थाप दिल्यास असे कार्य करणारांचा उत्साह वाढतो. त्यामुळे असे कार्यक्रम सर्वच स्तरावर राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बेलापूर पत्रकार संघाचे सचिव देविदास देसाई यांनी केले.
नाताळ सणाचे औचित्य साधुन शालोम ए जी चर्च बेलापूर यांच्या वतीने कोरोना काळात आपला जिव धोक्यात घालुन सामाजाची काळजी घेणार्या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवांचा सन्मान करण्यात आला त्या वेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बेलापुर ग्रामपंचायतीचे प्रशासक तगरे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे डाँ देविदास चोखर हवालदार अतुल लोटके उपस्थित होते.
यावेळी बेलापूर ग्रामपंचायतीचे प्रशासक तगरे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पंडीत सिस्टर आदिंनी मनोगत व्यक्त केले. शालोम ए जी चर्चचे पास्टर अलिशा जोगदंड यांनी कोरोना सारखे संकट पुन्हा येवु नये सर्वांना सुख शांती मिळावी या साठी प्रार्थना केली या वेळी बेलापूर पोलीस स्टेशनचे निखील तमनर बेलापूर पत्रकार सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, कामगार तलाठी कैलास खाडे, अविनाश शेलार, बाबासाहेब प्रधान, सुशिलाबाई खरात, मधुकर गायकवाड, जालिंदर गाढे, अमोल साळवे, सचिन साळुंके आदिसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी महसुल कर्मचारी बेलापूर ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋषीकेश जाधव प्रसाद शेलार, ललीत शेलार, निशिकांत शेलार, संकेत गिरमे, प्रसाद अमोलीक, गौरव शेलार आदिनी विशेष प्रयत्न केले. ऋषीकेश जाधव यांनी आभार मानले.