साईकिरण टाइम्स | २० डिसेंबर २०२०
येथील मेनरोडवरील संभवनाथ जैन श्वेतंबर मंदिराचे ट्रस्टी अमित गांधी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. की शनिवार १९ डिसेंबर रोजी जैन मंदिराचे जिनोध्दाराचे सध्या काम चालु आहे. १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मंदिरात दर्शनसाठी गेलो असता मदिराच्या जिनोध्दारासाठी काढुन ठेवलेले देवळाचे सहा नग पितळी ग्रिल्स दिसले नाही मी आजूबाजूला पाहिले व विचारपुस केली. पंरतु , देवळाचे ४ नग पितळी ग्रिल्स दिसले नाही तसेच इलेक्ट्रनिक मोटार हि दिसले नाही .त्यांनतर १९ डिसेंबरला सकाळी ९ वाजता पुन्हा मंदिरात दर्शनासाठी गेलो असता. तेथील पुजारीनी १८ डिसेंबरला रात्री मंदिराच्या जिनोध्दारसाठी ठेवलेलेल दोन पितळी ग्रिल्स व सात पितळी झाळ्या अंदाजे १५० ते १७५ वजानाच्या २ लाख २६ हजार २५० रुपये रक्कमेचा ऐवज चोरटयानी चोरुन नेल्याचे फिर्यादित सांगितले.
या घटनेने नंतर संभवनाथ जैन श्वेतंबर मंदिराचे ट्रस्टी शैलेश बाबरिया, अमित गांधी, सुमतीलाल शहा, अजितभाई नगरकर,पत्रकार अनिल पांडे, ललीत कोठारी यांच्यासह जैन बांधव जमा झाले होते. यानंतर सर्वानोमते पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यात आली.