साईकिरण टाइम्स | २ डिसेंबर २०२०
श्रीरामपूर | नगरपालिकेडून मागील अनेक दिवसांपासून शहरात गढूळ, बेचव पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार देऊनही पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याच्या निषेधार्थ, ७ डिसेंबर रोजी नगरपरिषदेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा जे.जे. फौंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले. शहरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असताना, मागील काही दिवसांपासून कुमट वास असलेले, गढूळ, बेचव पाणी पाणी पुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना ताप, घसा, सर्दी यासारखे आजार बळावत असल्याचा आरोप जे.जे. फौंडेशनचे प्रदेशाध्यक्ष जोएफ जमादार यांनी केला आहे.