'नक्षत्र कन्स्ट्रक्शन'ने केलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून काळ्या यादीत टाकावे; छावा स्वराज्य रक्षक सेनेचे उपोषण

साईकिरण टाइम्स | १ डिसेंबर २०२०

श्रीरामपूर | 'नक्षत्र कन्स्ट्रक्शन'ने केलेल्या रस्त्यांच्या कामाची सखोल चौकशी करावी, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच 'नक्षत्र कन्स्ट्रक्शन' कंपनीस काळ्या यादीत टाकावे, या मागणीसाठी छावा स्वराज्य रक्षक सेनेचे पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर पंचायत समितीसमोर आजपासून (दि.१) बेमुदत उपोषण सुरु केले आहे. 

छावा स्वराज्य रक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश भोसले, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष रॉकी लोंढे हे आज सकाळपासून उपोषणास बसले आहेत. 

श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव-गोंडेगाव रस्ता, उंबरगाव, मातापूर, कारेगाव, भोकर, मुठेवाडगाव, ब्राम्हणगाव, निमगाव खैरी, जाफ्राबाद, बेलापूर या ग्रामीण रस्त्यांच्या कामाची सखोल चौकशी करावी, ठेकेदार कंपनीने रस्त्यांच्या कामात अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैसे खाल्ल्याचा आरोप छावा स्वराज्य रक्षक सेनेच्या पदाधिकार्यांनी केला आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post