शिक्षण मंडळाचे अनुदान प्रकरणी लक्ष घालू - आ. सुधीर तांबे

साईकिरण टाइम्स | २८ नोव्हेंबर २०२०

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे नगरपालिकेकडे थकीत अनुदानाबाबत लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावू. याबाबत मंत्रालयात लवकरच नगर विकास खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण मंडळाचे थकीत अनुदान पालिकेकडून मिळवून देऊ त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षकांऐवजी इतर बारा केडरच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बीएलओची कामे देणेबाबत औरंगाबादच्या आयुक्तांप्रमाणेच नाशिक विभागीय आयुक्तांची भेट घेऊन हा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचे आश्वासन नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी दिले.

शिक्षण मंडळाचे थकीत अनुदान, बीएलओ नियुक्ती,पुणे उपसंचालक यांच्याकडून वेतनास होणारा विलंब,एमएस सीआयटी मुदतवाढ इत्यादी प्रश्नांबाबत शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांच्या पुढाकाराने नगरपालिका शिक्षक संघ, नगरपालिका गुरुमाऊली महिला आघाडी व श्रीरामपूर तालुका शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथील व्हीआयपी गेस्ट हाऊसवर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार तांबे बोलत होते.

संगमनेर नगरपालिकेत मी नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. हा प्रश्न लवकरच आपण सोडवू . बीएलओच्या कामाबाबत शिक्षकांना आज पर्यंत सक्ती केली गेली. परंतु यामध्ये सर्व केडरचे लोक सहभागी करून घेणेबाबत आपण विभागीय आयुक्तांशी चर्चा करू असेही ते म्हणाले.

श्रीरामपूर तालुक्यातील शिक्षकांनी बीएलओ कामाला उच्च न्यायालयाकडून मनाई आदेश घेतलेला असताना देखील तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांवर कामाबाबत दबाव आणला जात असल्याची तक्रार यावेळी समन्वय समितीतर्फे आमदार तांबे यांच्याकडे करण्यात आली. उच्च न्यायालयाचा मनाई आदेश असेल तर कामाबाबत सक्ती करता येणार नाही. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू असेही ते म्हणाले.

समन्वय समिती मधील वेगवेगळ्या संघटनांवर पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल राजेश बनकर, राजू गायकवाड, चंद्रकांत मोरे, शकील बागवान, प्रताप देवरे, प्रकाश माने, संतोष वाघमोडे, सरदार पटेल, मिनाज शेख, कांचन मुसळे, विलास निकम आदींचा आ. डॉ.तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अहमदनगर जिल्हा नगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रताप देवरे ,शहराध्यक्ष प्रकाश माने यांनी पेन्शनरांचे सेवानिवृत्ती वेतनास दरमहा होणारा विलंब दूर करण्याची मागणी केली.

शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत वेळोवेळी आमदार सुधीर तांबे यांचेकडून अनमोल सहकार्य मिळत असल्याबद्दल समन्वय समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षक बॅंकेचे ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण, बाळासाहेब सरोदे, प्रल्हाद साळुंके,चंद्रकांत मोरे ,राजेश बनकर,शकिल बागवान, सरदार पटेल,संतोष वाघमोडे, एकनाथ रहाटे, वाघोजी पटारे, दीपक शिंदे, सिताराम भांगरे, चंद्रकांत पंडित, शिवाजी भालेराव, राजू गायकवाड,चंद्रकांत बनकर, मोहम्मद आसिफ, एजाज चौधरी, मिनाज शेख, कांचन मुसळे, शशिकला सराफ, वहीदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन शेख,अस्मा पटेल, नाझिया शेख,सेवानिवृत्त संघटनेचे प्रताप देवरे, शब्बीर शेख, विलास निकम, अशोक गायकवाड, प्रकाश माने आदींनी भाग घेतला .शेवटी शकील बागवान यांनी आभार मानले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post